सोमय्यांना मुंबईतच रोखण्याचा पोलिसांचा प्लॅन फसला 

मी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत जाऊ शकतो.
Kirit Somaiya going to Kolhapur after Collecter's District Ban Notice
Kirit Somaiya going to Kolhapur after Collecter's District Ban Notice

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पोलिसांच्या मोठ्या विरोधानंतरही महालक्ष्मी एक्स्प्रेसने अखेर आठ वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूरसाठी रवाना झाले आहेत. त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेश बंदीची नोटीस बजावली आहे, त्यामुळे कोल्हापूरचे प्रशासन आता काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Kirit Somaiya going to Kolhapur after Collecter's District Ban Notice)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात १२७ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्यांनी आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर आज दुपारपासून बंदोबस्त वाढवला होता. त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप खुद्द सोमय्या आणि भाजप नेत्यांनी केला होता. त्याबाबतचे ट्विट सोमय्यांनी केले होते. 

दरम्यानच्या काळात त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली जिल्हाबंदीची नोटीस घेऊन मुंबई पोलिस सोमय्यांच्या घरी धडकले. सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेत मला कोल्हापूरला जाण्यास बंदी आहे. पण, मला घराबाहेर का पडू दिल जात नाही, असे त्यांनी मुंबई पोलिसांना सुनावले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमय्या हे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपटीवर दाखल झाले. गणेश विसर्जनानंतर त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारत कोल्हापूरला जाण्याचे जाहीर केले.

कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोचलेल्या सोमय्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. कोल्हापूरला जाण्याबाबत शेवटपर्यंत ठाम राहिले. पोलिसांबरोबर ते मोठमोठ्याने भांडत होते आणि कोल्हापूरला जाणार असल्याचे वारंवार सांगत होते. मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे, मी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत जाऊ शकतो, असा युक्तीवाद त्यांनी पोलिसांपुढे केला. त्यामुळे पोलिसांनाही त्यांना अडवता आले नाही. अखेर रात्री आठ वाजून २० मिनिटांनी ते महालक्ष्मी एक्स्प्रसेने तो कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

आपल्या मंत्र्यांचा घोटाळा बाहेर निघणार म्हणून पवार आणि ठाकरे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी वारंवार केला. मात्र, ते कोल्हापूरला जाण्यावर ठाम राहिले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. सोमय्या तर मुंबईहून निघाले आहेत, त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोमय्या यांना या महामार्गावरील कोणत्यातरी पोलिस ठाण्यात हद्दीत अडवले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com