Kirit Somaiya  .jpg
Kirit Somaiya .jpg

मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी माझ्या अटकेचे आदेश; सोमय्यांचा खळबळजनक आरोप 

महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवार (ता. २० सप्टेंबर) कोल्हापूरला जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देणार, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.(Kirit Somaiya criticizes the state government) 

त्या संदर्भात सोमय्या यांनी शनिवारी माहिती दिली होती. मात्र, आता सोमय्या यांनी ट्वीट करत नवी माहिती दिली आहे की ''ठाकरे सरकारकडून दडपशाही अवलंबली जात आहे, माझा घराखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी लावला आहे. हसन मुश्रीफ गैरव्यवहार दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्री यांनी दिले आहेत. मी मुलुंडहून ५.३० ला निघणार आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता छत्रपती शिवाजी महराज रेल्वे स्टेशनवरुन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे. पण गृमंत्र्यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

दरम्यान,  सोमय्‍या यांनी मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्‍ह्यातील कार्यकर्ते संतप्‍त झाले आहेत. जिल्‍ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्‍हापूरकरांना आव्‍हान दिले आहे. त्यामुळे कितीही सुरक्षा दिली तरी त्यांना कोल्‍हापुरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्‍हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखाना काढला आहे. लोकांनी आपल्या घामाचे पैसे देऊन शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र, माजी खासदार सोमय्‍या हे खोटे आरोप करत आहेत. त्यांना बळ देण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, कोल्हापूरकर जनता गप्‍प बसणार नाही. 

मुंबईतील भय्‍या कोल्‍हापुरात येऊन येथे आव्‍हान देत असेल तर त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. रेल्‍वे स्‍टेशनपासून संताजी घोरपडे साखर कारखाना, कागल, मुरगूड अशा ज्या ज्या ठिकाणी सोमय्‍या जातील, त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना हिसका दाखवतील, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.   
Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com