अखेर भास्कर जाधवांना मिळाली सरकारी सुरक्षा

पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.
Bhaskar jadhav.jpg
Bhaskar jadhav.jpg

चिपळूण : अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला होता. त्यानंतर अखेर 
जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. (Eventually Bhaskar Jadhav got government protection)

पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलेच गाजवले. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा 
अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसे चित्रही पाहायला मिळाले. मात्र भास्कर जाधव 
जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटले. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला 
मिळाले.

सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. 
त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयाबाहेर दोन 
पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 
 

हेही वाचा..

लसीकरणाबाबत पारदर्शकतेसाठी भाजपकडून चर्चा

संगमनेर : केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण उपलब्ध केले आहे. मात्र, काँग्रेसप्रणीत सत्ता असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत होते. याबाबत भाजपच्या संगमनेर शहर पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांची भेट घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना सुचविल्या.

भाजपचे संगमनेर शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लसीकरणातील अडथळे, नगरसेवकांच्या वशिल्याने होणारी मध्यस्थी, अनियमितता या बाबी लक्षात आणून दिल्या. नगरसेवकांच्या मर्जीतील लोकांची यादी ग्राह्य धरली जाते, असा प्रकार अनेक वेळा उघडकीस येऊनही, नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

गेल्या शनिवारी असा प्रकार उघडकीस आणून हाणून पाडला होता. त्यानंतर भाजपच्या मागणीनुसार प्रभागनिहाय लसीकरण सुरू झाले, तरी नगरसेवकांच्या मनमानी कारभाराने वशिल्याच्या यादीला प्राधान्य दिले जात होते. त्यावर उपाययोजना म्हणून अनुक्रमे प्रभाग निवडला जाईल व प्रत्यक्ष लसीकरणाच्या एक दिवस अगोदर, प्रभागात ठरलेल्या ठिकाणी ऑनलाइन नावनोंदणी होईल, लाभार्थींची ती यादी प्रसिद्ध केली जाईल, असा सुलभ पर्याय श्रीराम गणपुले यांनी सुचविला. डॉ. सचिन बांगर यांनी हे मान्य करीत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com