खासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी ! तर चारही पक्षांचे मंत्री नगरमध्ये असते

खासदार डाॅ. विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत काॅंग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेत लोकसभा जिंकली. भाजपमध्ये नव्याने दाखल होऊन नगरची ही जागा भाजपला मिळाली.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

नगर : केंद्रीय मंत्रीमंडळात नगरचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना संधी मिळेल, अशी आशा होती, मात्र या पदाने हुलकावणी दिली. केंद्रीय मंत्रीपद जिल्ह्यात या निमित्ताने मिळेल, या अपेक्षावर पाणी फिरले. (MP Vikhen dismissed as Minister! The ministers of all the four parties are in the city)

सध्या जिल्ह्यात भाजपकडे एक खासदार व तीन आमदार आहेत. शिवसेनेचे शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे व काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मंत्री नगर जिल्ह्यातील आहेत. खासदार डाॅ. विखे पाटलांना मंत्रीपद मिळाले असते, तर प्रत्येक पक्षाचा एक मंत्री नगर जिल्ह्यात असता.

खासदार डाॅ. विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत काॅंग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेत लोकसभा जिंकली. भाजपमध्ये नव्याने दाखल होऊन नगरची ही जागा भाजपला मिळाली. त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर असलेले वर्चस्व, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री अमित शहा यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे खासदार विखे पाटलांना मंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. तसे झाले असते, तर कमी वयात थेट मंत्रीपदावर झेप घेण्याची किमया साधता आली असती, मात्र ही संधी हुकली. 

हेही वाचा..

तालुका कोरोणा मुक्तीसाठी 11 गावात शंभर टक्के आरोग्य तपासणी करणार

पारनेर : पारनेर शहरासह 11 गावात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढल्याचे दिसून आल्याने ती गावे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. त्या साठी या गावात साठी शंभर टक्के आरोग्य व कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गावात उद्या पासून कंन्टोनमेंट झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

पारनेर तालुक्यात पारनेर शहरासह निघोज ,पठारवाडी, पिंपरी जलसेन, पिंपळगव रोठे, भाळवणी, जवळा, कर्जुले हर्या, लोणीमावळा, वनकुटे व जामगाव या 11 गावात गेली काही दिवसांपासून सातत्याने रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्या गावात तीन दिवस गावातील सर्वांची आरोग्य तपासणी व कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या गावात स्वतंत्रपणे एक अधिका-याची नेमणुक पालक म्हणून करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणी पथक नेमून गावातील सर्वांची आरोग्य व कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.हा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये घेण्यात आल्याचेही देवरे यांनी सांगितले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com