ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात...फडणवीसांना मागितली मदत

ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेची सोमवारी बैठक झाली
Chhagan Bhujbal called Devendra Fadnavis for OBC reservation
Chhagan Bhujbal called Devendra Fadnavis for OBC reservation

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर राज्य सरकारविरोधील रोष वाढत चालला आहे. अनेक ओबीसी संघटना तसेच भाजपनेही जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनीही आरक्षणासाठी जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. (Chhagan Bhujbal called Devendra Fadnavis for OBC reservation)

ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेची सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीच्या एक दिवस आधी त्यांनी विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. ओबीसी आरक्षणासाठी सरकारमधील राजकीय पक्षांसह विरोधी पक्षांचीही बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. सगळ्या संघटनाना सोबत घेऊन लढू. तसेच रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यांना केंद्राकडून मदत मागण्याची विनंती करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केवळ पाच जिल्ह्यांपुरता नाही. संपूर्ण देशात हा निर्णय लागू झाला आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये 27 टक्के आरक्षण लागू आहे. राजकीय आरक्षणाला धक्का लागला आहे. राज्यातील ओबीसींच्या सुमारे 65 हजार जागा कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. बैठकीत या विषयावर ते चर्चा करतील. भाजपचे सरकार असताना त्यांच्याकडे आरक्षणाबाबतचा डाटा नव्हता. आता आम्ही डाटा मिळण्याची मागणी केली आहे. 

सर्व बाजूने कोंडी झाल्या मुळे अडचण निर्माण झाली आहे. आरक्षणासाठी विरोधकांनी आंदोलन केलं तरी चांगलंच आहे. त्यामुळे या मागणीला बळ मिळणार आहे. समता परिषदही जनआंदोलन करणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर निर्णय घेतला जाईल. आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारने लक्ष घालायला हवं. सध्या जुन्या पद्धतीने २७ टक्के आरक्षण देऊन निवडणुका घ्यावात, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी (ता.८) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर ठाकरे यांनी पंतप्रधानांना भेटणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही जाण्याची शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com