भाजपचा खडसेंवर जुना राग; म्हणूनच त्यांच्या मागे चौकशीचा फेरा : जयंत पाटील  - BJP's old anger against Eknath Khadse : Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भाजपचा खडसेंवर जुना राग; म्हणूनच त्यांच्या मागे चौकशीचा फेरा : जयंत पाटील 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जुलै 2021

त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही.

मुंबई  ः माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिल्यानेच चिडून जाऊन भारतीय जनता पक्ष केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने अडकवत आहेत. मात्र, एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही, त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. (BJP's old anger against Eknath Khadse : Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा : भाजप वाढवणाऱ्या खडसेंची ईडी चौकशी; तर आयारामांना मंत्रिपदाची बक्षिसी 

एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावरून कारवाई सुरू आहे, त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण, त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत एकनाथ खडसे यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्यात आले, असा आरोपही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी केला आहे.
 
हेही वाचा : सुरेश जैन, गुलाबराव देवकरानंतर आता खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा
 
जळगाव : राजकारण हे जनतेच्या विकासासाठी केले जाते, असे म्हटले जाते. परंतु जळगाव जिल्ह्यातील राजकारणात विकास तर दूरच आहे. मात्र, चौकशीच्या फेऱ्यात पूर्ण राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्हा एकेकाळी विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता. परंतु याला दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल. आज जळगाव जिल्ह्यात केवळ 'चौकशी' हाच शब्द राजकीय क्षेत्रात विकासावर मात करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील नेत्यांचे राज्याच्या राजकारणात दबदबा होता, मात्र चौकशीच्या फेऱ्यात नेत्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. 

शिवसेना नेते व राज्याच्या राजकारणात वकूब असलेले सुरेशदादा जैन घरकुल प्रकरणात चौकशीत अडकले त्यांना शिक्षा झाली. ते जामिनावर सुटले असले तरी राजकारणापासून आता अलिप्त आहेत. ते फारसे सक्रिय नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हेसुध्दा घरकुल चौकशीत अडकले आहेत. त्यांनाही शिक्षा झाली. तेही जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी गेली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, आज त्यांचा राजकीय अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे हे राज्याच्या राजकारणात महत्वाचे नेते होते, भारतीय जनता पक्षाला बळकट करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्या पाठीमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय बी. एच. आर. पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांचे मित्र भाजपचे आमदार चंदू पटेल या प्रकरणात फरारी आहेत. त्यामुळे महाजनही संकटात असल्याचे बोलले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख