भाजप वाढवणाऱ्या खडसेंची ईडी चौकशी; तर आयारामांना मंत्रिपदाची बक्षिसी 

राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
 Eknath Khadse .jpg
Eknath Khadse .jpg

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी (ता. ७ जुलै) सायंकाळी पार पडला. या विस्तारात राज्यातून नारायण राणे, (Narayan Rane) भागवत कराड, कपिल पाटील, (Kapil Patil) भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. (Eknath Khadse's inquiry through ED) 

त्यावरुन राज्यात एकच चर्चा रंगली आहे. काय योगायोग आहे बघा, शिवसेना, काँग्रेस पक्षातून भाजप मध्ये गेलेले नारायण राणे केंद्रात मंत्री झाले. आणि मुलाखती देत होते. तर त्याच वेळी मूळ भारतीय जनता पक्षात असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे ईडी कार्यालयाच्या दारात चौकशीला जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर मुलाखतीत आपल्या व्यथा मांडत होते. 

नारायण राणे हे शिवसेना आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आले आहेत.  कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. काल त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, आज ते पदभार स्वीकारत आहेत. 

याच वेळी मूळ भाजपचे असलेले व राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केलेले एकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी कार्यालयात गेले आहेत. कार्यालयात जाण्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांना मुलाखती देवून आपली व्यथा मांडली. त्यामुळे भाजपचे मूळ जात्यात आणि बाहेरचे आलेले सुपात असे चित्र दिसून येत आहे. 

दरम्यान, खडसे म्हणाले की, भोसरी जमीन व्यवहारात मला जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकरणाला राजकीय वास येतो आहे. या चैाकशीच्या हेतूवरच मला संशय आहे. कारण, काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील व्हाट्स अॅप ग्रुपवर ''कुछ तो होनेवाला है'' असा मेसेज फिरत होता. याचा अर्थ असा आहे की, काही लोकांना या कारवाईची पूर्वकल्पना होती. त्यातून माझ्या मागे हा चौकशीचा फेरा जाणीवपूर्वक लावला जात आहे, हे सिद्ध होते. या सर्व प्रकरणाला राजकीय वास येत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानेच मला आणि माझ्या परिवाराला छळण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न आहे, असा आरोप खडसे यांनी केला. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com