परिचारकांवर टीका करण्याऐवजी राष्ट्रवादीचे लोक आमचीच मापं काढतात : कल्याण काळेंची खंत

सध्या पक्षात नेते कमी आणि कारभारी जास्त झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Kalyan Kale expressed displeasure over factionalism in NCP
Kalyan Kale expressed displeasure over factionalism in NCP

पंढरपूर : आचारी जास्त झाल्यानंतर जसा स्वयंपाक बिघडतो, तशीच अवस्था पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला. आमदार प्रशांत परिचारक हे आमचे विरोधक असतानाही त्यांच्यावर टीका करण्याऐवजी आपलेच लोक आमची मापं काढतात, अशी खंतही काळे यांनी व्यक्त केली. काळे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्ता आहे. (Kalyan Kale expressed displeasure over factionalism in NCP)

पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता.12 सप्टेंबर) कासेगाव येथे पार पडला. या प्रसंगी बोलताना काळे यांनी पक्षात सुरु असलेल्या गटबाजीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षातील कार्यकर्ते आमची माफ काढतात, अशी खंतही व्यक्त केली.

काळे म्हणाले की, आमचे विरोधक हे परिचारक व त्यांची कंपनी आहे. परंतु त्यांच्यावर कोणी टीका करत नाहीत. आपलेच लोक आमची मापं काढून आमच्यावर सीसीटीव्हीप्रमाणे पाळत ठेवतात. दुष्काळामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवणार नाही. फक्त विठ्ठल आणि वसंतराव काळे या दोनच साखर कारखान्याविषयी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे.

परिचारकांच्या कारखान्याविषयी लोक चर्चा करत नाही. आम्हालाच केवळ टार्गेट केले जात आहे. यामध्ये राष्ट्रवादीचेच लोक आघाडीवर आहेत. आमच्या बायकापण आमच्यावर जेवढं लक्ष देत नसतील, तेवढं लक्ष आमच्यावर ठेवले जात आहे. हे आपलेच लोक करतात. सध्या पक्षात नेते कमी आणि कारभारी जास्त झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आम्ही साखर कारखान्यांची विस्तारवाढ केली, त्यामुळेच आमचे कारखाने अचडणीत आल्याचा दावाही काळे यांनी या वेळी बोलताना केला. काळे यांनी जाहीर भाषणात पक्षातील पदाधिकाऱ्यांवर उघड टीका टिप्पणी केल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्यत आहे. काळे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचा दुसरा गट काय उत्तर देणार, याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष असणार आहे. 

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com