राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा कॉंग्रेसच्या आमदाराकडून छळ  - Congress MLA P. N. Patil case has been registered against-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा कॉंग्रेसच्या आमदाराकडून छळ 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 12 सप्टेंबर 2021

या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

कऱ्हाड : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे कॉंग्रेसचे आमदार आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग निवृत्ती ऊर्फ पी. एन. पाटील यांच्यासह  तिघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आमदार पाटील यांचा मुलगा राजेश आणि मुलगी टीना महेश पाटील यांचा समावेश आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांची सून आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आदिती राजेश पाटील यांनी ‘आपला छळ होत आहे,’ अशी तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Congress MLA P. N. Patil case has been registered against )

कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबीयांकडून आदिती यांना शिवीगाळ आणि मारहाण करत एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून आमदार पी. एन. पाटील यांच्यासह, आदिती ह्यांचे पती राजेश पाटील, नणंद टीना महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती पाटील यांनी ही फिर्याद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली होती. 

हेही वाचा : चालत्या दुचाकीवर चाकूने वार करून कोतवालाचा खून 

पती राजेश पाटील, सासरे पी. एन. पाटील आणि नणंद टीना पाटील यांनी संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला, असे फिर्यादीत आदिती पाटील यांनी म्हटले आहे. फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या विविध कलमान्वये आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : सुकट बोंबील विकणारा मनोज रातोरात झाला मनोहरमामा!

दरम्यान, आदिती ह्या राज्याचे सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांची पुतणी, तर कराड येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख