अमित शहा सहकार मंत्री बनले अन्‌ भाजप नेत्यांकडून धमक्या देणे सुरू

हे भाजप नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे.
BJP leaders threaten co-operative leaders as soon as Amit Shah becomes Co-operation Minister : Malik
BJP leaders threaten co-operative leaders as soon as Amit Shah becomes Co-operation Minister : Malik

मुंबई : केंद्रात नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती आणि त्यानंतर त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर भारतीय जनता पक्षातील लोकांकडून धमक्या दिल्या जात आहे. सहकार संस्था असलेल्या लोकांची आता खैर नाही, असे म्हटले जात आहे. पण, सहकार हा राज्याच्या अखत्यारित येणारा विषय आहे. मल्टीस्टेट विषय असेल तरच केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करता येईल. परंतु एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणे योग्य नाही. हे भाजप नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. (BJP leaders threaten co-operative leaders as soon as Amit Shah becomes Co-operation Minister : Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (ता. १२ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत घेत सहकार मंत्रालयावरून राज्यात सुरू असलेल्या वादंगावरून भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने सहकार मंत्रालय सुरू केले असले तरी सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारित येणारा आहे. मल्टीस्टेट विषय असेल तरच केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करता येईल. नवे सहकार मंत्रालय काय नवे कायदा करते, तोपर्यंत नव्याने काही होणार नाही. पण भाजप नेत्यांकडून सहकारातील लोकांना धमकी दिल्या जात आहेत. एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणे योग्य नाही, हे भाजप नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना ९७ वी घटनादुरुस्ती करून सर्व अधिकार सहकारी संस्थांना देण्यात आलेले आहेत. निवडणूक घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक यंत्रणा उभारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पवार यांनी ह्या सहकारी संस्थांना त्यावेळीच स्वायत्तता दिली आहे. त्या स्वायत्ततेच्या दर्जावर कोणी गदा आणत असेल, त्यापद्धतीची पाऊले उचलली जात असतील तर त्यावर आपण भाष्य करू. पण, भाजप नेत्यांना मी एवढंच सांगतो आहे की, हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो, एखाद्या नेता मंत्री झाला म्हणजे सर्वकाही अधिकार त्यांना मिळतात, असे काही नसते. त्यामुळे बोलत असताना जबाबदारीने बोलले पाहिजे, असा सूचक इशाराही नवाब मलिक यांनी या वेळी बोलताना दिला.

तो दाढीवाला चोर कोण?

केंद्रीय सहकार मंत्रालयाबाबत शरद पवार यांनी रविवारी (ता. ११ जुलै) बारामतीत पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली की, ‘चोर के दाढीमें तिनखा.’ तो दाढीवाला चोर कोण आहे. त्याचे नावही आशिष शेलार यांनी घेतले पाहिजे. दाढीवाला चोर म्हणत असताना त्यांनी तो चोर कोण आहे, हेही स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com