Manohar Mama Bhosale arrested by police in Satara
Manohar Mama Bhosale arrested by police in Satara

उंदरगावचा भामटा मनोहरमामा भोसलेला अखेर साताऱ्यात पकडले

मनोहरमामा हा अत्यंत महागड्या गाड्यातून फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

माळेगाव (जि. पुणे) : सोलापर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील उंदरगावचा भामटा मनोज उर्फ मनोहरमामा भोसले याला पुणे जिल्हा (ग्रामीण) गुन्हे शोध पथक आणि बारामतीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी साताऱ्यात मोठ्या शिताफीने पकडले. मनोहरमामा हा अत्यंत महागड्या गाड्यातून फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो बारामतीसह अनेक ठिकाणच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना वॉन्टेड होता. भोसले वगळता अद्याप दोन आरोपींना पकडणे बाकी असल्याची माहिती बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गवारी यांनी दिली. (Manohar Mama Bhosale arrested by police in Satara)

मनोहर भोसले हा आपण बाळमामांचा अवतार असल्याचे सांगत लोकांना गंडा घालत होता. भोसले याची गेली महिनाभरापासून विविध प्रकरणे गाजत होती. त्यावरून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. गुरुवारी (ता. ९ सप्टेंबर) करमाळा पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात झाला. 

तत्पूर्वी मनोहर भोसले याच्यासह तिघांविरुद्ध बारामती येथे फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. मनोहर भोसले याच्या निषेधाचा ठरावही आदमापूर (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने केला होता. त्यानंतर उंदरगाव येथील ग्रामपंचायतीनेही मनोहर भोसले यांच्या मठाच्या बांधकामाला  परवानगी दिली नसल्याचा खुलासा केला होता. त्याच्याविरुद्ध करमाळा पोलिसातही फसवणुकीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
 
कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने लूटले

बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड-कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोहरमामा याच्यासह तिघांनी संगनमत करीत बारामतीतील रुग्णाच्या कुटुंबीयांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. हा फसवणुकीचा प्रकार मागील तिन वर्षांपासून सुरू होता. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी ता. 9 सप्टेंबर रोजी तिघांविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मनोहरमामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. 

महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहरमामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध  कारवाई केली होती. 

दरम्यान, शशिकांत खरात यांनी फिर्यादीमध्ये आरोपींविरुद्ध गंभीर तक्रार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मागिल तीन वर्षापासून मनोहर भोसले याने मी बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासविले. तुझ्या वडिलांचा गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे त्याने सांगितले. तसेच बाभळीचा पाला, साखर, भंडारा माझ्या आजारी वडिलांना खाण्यास दिला व विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार  शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासोबत संगनमत करून मनोहरमामा याने वेळोवेळी दोन लाख 51 हजार पाचशे रुपये घेतले. हे पैसे न दिल्यास माझ्या वडिलांना जीविताची भीती त्यांनी घातली. तसेच, हे पैसे परत मागितल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे खरात यांनी फिर्यादीत नमूद केलेले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com