अजितदादा म्हणाले, `चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त झालेत!`

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सत्ता नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काहीही आरोप करीत सुटले आहेत. ते कोल्हापूरचे पालकमंत्री असतांना शिवसेनेच्या तेथील आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Chandrakant patil- Ajit Pawar
Chandrakant patil- Ajit Pawar

नाशिक :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सत्ता नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. (Due to not in power Chandrakant patil is in Frustraition) त्यामुळे काहीही आरोप करीत सुटले आहेत. ते कोल्हापूरचे पालकमंत्री असतांना शिवसेनेच्या तेथील आमदार राजेश क्षीरसागर यांनी (Shivsena MLA Rajesh kshirsager made allegations of corruption on Chandrakant Patil) त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) म्हणाले. 

उपमुख्यमंत्री पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याचे म्हटले होते. अजित पवार यांच्यावर पोलिस आधिकाऱ्यांनी आरोप केल्याने त्यांच्यावरील आरोपाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीची मागणी केली होती. त्याविषयी विचारले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, श्री. पाटील ज्या पोलिसाविषयी बोलत आहेत. ते आरोपी म्हणून तुरुंगात आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अशा आरोपी असलेल्यांवर विश्वास ठेवायचा का?. 

ते पुढे म्हणाले, विश्वास ठेवायचाच असेल तर, मग चंद्रकांत पाटील सहकार आणि महसूल मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या तेथील आमदार राजेश क्षीरसागर यांनी भष्ट्राचाराचे आरोप केले होते. क्षीरसागर हे आमदार होते. तीन लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार असतांना त्यांनी आरोप केले आहेत. आरोप कोण करतात हे महत्वाचे आहे. एखादा आरोपी तक्रार करेन, तुरुंगात राहून कुणाचेही नाव घेईन त्याला लक्ष्य करायचे का?. याचा विचार केला पाहीजे. पण सत्ता गेल्यामुळे चंद्रकांतदादा हे वैफल्यग्रस्त झाले आहेत.

जनगणनेचे आकडे द्यायला काय हरकत ?
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप फेटाळतांना ते म्हणाले की, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने स्थानीक स्वराज्य संस्थातील ५६ हजार जागा कमी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी केंद्र शासनाने जणगनना केल्याची आकडेवारी गरजेची आहे. पालकमंत्री छगन भुजबळांच्या साक्षीने सांगतो की, आमची तयारी आहे.पण केंद्र शासनाने जनगणनेची आकडेवारी द्यायला काय हरकत आहे. सत्तेत असलेल्यांना महाविकास आघाडी सरकारला सर्व समाज घटकांना सोबत घेउन हे सरकार काम करत हा विश्वास द्यायचा आहे. त्यादृष्ट्रीने सरकार काम करत आहे. मात्र विरोधकांना लोकांमध्ये हा संदेश जाऊ द्यायचा नाही. त्यामुळेच ते आरोप करीत आहे.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय तसाच आहे. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करणारे आहोत. आमच्या वरिष्ठांची साठ वर्षाची वाटचाल बघीतली तरी, हे लक्षात येईल. मात्र हा विषय उच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे. यात दिव्यांगाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरणात सरकारला निर्णय घेता येत नाही

विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार भारती पवार, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहूल ढिकले आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com