अजितदादा म्हणाले, `समोर देखील काही पवार असतील ना?` - Dy CM Ajit Pawar said, this is your blessings and love, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

अजितदादा म्हणाले, `समोर देखील काही पवार असतील ना?`

संपत देवगिरे
गुरुवार, 1 जुलै 2021

महाविद्यालयाला नाव दिले शरद पवार. प्रास्तविक केले त्या निलीमाताई पवार, उद्घाटन करणारे अजित पवार. संस्थेच्या संग्रहालयाला नाव दिले उदाजी महाराज पवार, संस्थेचे माजी सरचिटणीस (कै) वसंतराव पवार. अन् समोर देखील काही पवार असतील ना?. हे सगळे तुमचे प्रेम आहे, 

नाशिक : महाविद्यालयाला नाव दिले शरद पवार. (College name is sharad pawar) प्रास्तविक केले त्या निलीमाताई पवार, उद्घाटन करणारे अजित पवार. संस्थेच्या संग्रहालयाला नाव दिले उदाजी महाराज पवार, संस्थेचे माजी सरचिटणीस (कै) वसंतराव पवार. अन् समोर देखील काही पवार असतील ना?. (There must some Pawar in audiance) हे सगळे तुमचे प्रेम आहे, त्याला मी तरी काय करणार?. गंभीर स्वभाव असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy. C. M. Ajit Pawar) यांनी हा योगायोग सांगून उपस्थितांच्या गालावर स्मीतहास्य पेरले.   

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शरदचंद्र पवार कॅालेज ऑफ आर्किटेक्चर, राजश्री शाहू महाराज पॅालिटेक्निक आणि उदाजी महाराज पवार मराठा शैक्षणीक वारसा संग्रहालयाचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ही संस्था १०७ वर्षाची झाली. त्यात छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांपासून तर वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यापर्यंत अनेकांनी त्यात योगदान दिले. सामाजिक प्रेरणा देण्याचे काम करताना अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथांच्या विरोधात तसेच बहुजन वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात व बळ देण्याचे काम शाहू महाराजांनी केली. हेच कार्य संस्थेचे पदाधिकारी पुढे नेत आहेत. 

ते पुढे म्हणाले, संस्थेच्या माहविद्यालयाला शरद पवार यांचे नाव दिले आहे. त्याला साजेशे काम त्या महाविद्यालयत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व संस्थाचालकांनी केले पाहिजे. त्यावर बारीक लक्ष ठेवावे. या संस्थेत अनेकांनी सहाय्य केले. शरद पवार तर गेली पन्नास वर्षे लोकांमध्ये काम करीत आहेत. सत्तेत असो वा नसो, शेतकऱ्यांच्या मदतीला ते धाऊन जातात. मदत करताता. आपत्तीत बांधावर जातात. शिक्षणाच्या कामाला तर ते नेहेमीच मदत करतात. त्यामुळे पवार कोणी एका समाजाचे नव्हे तर सबंध महाराष्ट्राचे झाले आहेत.  

५ कोटीची मदत
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी सांगितलेल्या अडचणींचा उल्लेख केला. हे सर्व प्रश्न विविध विभागाच्या मंत्र्यांशी संबंधीत आहेत. त्यांच्याकडे ते सुटतील याची दक्षता घेऊ. पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. त्यामुळे काळजी नाही. हे प्रश्न निश्चित सोडवू. शिक्षण संस्थेतून एक दर्जेदार पिढी घडविण्याचे काम आपण सर्व करू, असे सांगत पाच कोटी रुपये मदत जाहीर केली. 

यावेळी विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, संस्थेचे अध्यक्ष डॅा तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस निलीमाताई पवार, चिटणीस डॅा सुनिल ढिकले, उपसभापती राघो नाना अहिरे, आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार नितीन पवार, आमदार नरेंद्र दराडे, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
....
हेही वाचा...

आदिवासी संशोधन,, प्रशिक्षण संस्था नाशिकला स्थलांतरीत करा!
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख