नाशिककरांचा गळा आवळला, तेव्हा कुठे होते भाजप?

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पक्षाने दिलेला आदेश शिरलंवाद्य मानून भाजपचे पदाधिकारी तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र महापालिकेत त्यांची सत्ता आहे. अव्वाच्या सव्वा घरपट्टी, पाणीपट्टी आकारणी करून जनतेला वेड्यात काढले.
नाशिककरांचा गळा आवळला, तेव्हा कुठे होते भाजप?
Hemlata Patil

नाशिक : बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पक्षाने दिलेला आदेश शिरलंवाद्य मानून भाजपचे पदाधिकारी तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. (As parity`s instruction BJP leaders approach police for complain against CM) मात्र महापालिकेत त्यांची सत्ता आहे. (They are in power in NMC) अव्वाच्या सव्वा घरपट्टी, पाणीपट्टी आकारणी करून जनतेला वेड्यात काढले. (They fool people by increased House & Water tax) त्यांचा गळा आवळला, तेव्हा भाजप कुठे होते?. (That time where was BJP) भाजपची मंडळी जनतेच्या प्रश्नांशी किती कनेक्टेड आहे, हे यावरून दिसले, अशी टिका काँग्रेसच्या प्रवक्त्या व नगरसेविका डॅा हेमलता पाटील (Dr Hemlata Patil) यांनी केली. 

यासंदर्भात त्यांनी पत्रक काढले आहे. त्या म्हणाल्या, यानिमित्ताने भाजप पदाधिकारी जनसामान्यांच्या प्रश्नांशी किती कनेक्टेड आहेत, याचे दर्शन नाशिककरांना झाले. गेली पाच वर्ष नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या काळात आव्वाच्या सव्वा घरपट्टी/पाणीपट्टी लाऊन नाशिककरांचा गळा आवळताना भाजप महापौरांनी फक्त राणाभिमदेवी थाटात गर्जना करून शहरवासीयांना वेड्यात काढले. या पाच वर्षात स्मार्ट सिटी कंपनीने पुर्ण नाशिकचा बट्ट्याबोळ केला. आजघडीला नाशिकचे मुख्य रस्ते फोडून मक्तेदार परांगदा झाला आहे. सामान्य नागरिक रोज अपघातांचा सामना करत आहेत. पण या विषयी स्मार्ट सिटी कंपनीच्या मिटींगमध्ये कामांना मंजुरी द्यायची आणि महासभेत बोंबाबोंब ठोकायची एव्हढीच मर्यादित भुमिका भाजपने बजावली. 

पाच वर्षात एकही पार्किंग प्लेस डेव्हलप न करता स्मार्ट पार्किंग बद्द्ल आळीमिळी गुपचिळी धोरण अवलंबिले. आज महापालिकेचे पार्किंग लॉट उपलब्ध नाहीत. कोणत्याही कमर्शियल कॉंप्लेक्सेसमध्ये पुरेसे पार्किंग नाही. ज्या रस्त्याच्या कडेला पार्किंग केल्यानंतर जी स्मार्ट सिटी पैसे उकळणार होती, तिथे पार्किंग केल्यानंतर आता पोलिस गाडी उचलतात. टोईंगच्या गाडी मागे सैरावैरा पळणारे नागरिक हे केविलवाणे दृश्य रोज राजिव गांधी भवन समोर पहायला मिळते. पण या विरूद्ध एकही भाजपचा पदाधिकारी पोलिस स्टेशनला जाब विचारायला गेलेला पाहिला नाही. 

महापालिकेच्या महत्वाच्या जागा अगदी भालेकरांच्या योगदानातुन उभी राहीलेली भालेकर हायस्कूल देखील महापालिकेने लिलावात काढली.  सगळ्या महत्वाच्या समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. कोणीही त्यावर आवाज उठवित नाही. जावई ठेकेदारांसाठी स्थायी समिती सभापती पायघड्या घालतात. इतक्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्यासाठी असताना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध फुटकळ कारणावरून तक्रार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नाशिककरांशी प्रतारणा केली आहे. या निमित्ताने आपल्या बौद्धिक दिवाळखोरी चे प्रदर्शन देखील केले आहे.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.