शेतकरी कायद्यांच्या विरोधात नाशिकमधून रणशिंग!

केंद्राच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमारेषेवर आठ महिन्यांपासून लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा शेतकरी संघटना समन्वय समितीतर्फे रविवारी सकाळी अकराला नाशिकमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात येईल.
Tractor rally
Tractor rally

नाशिक : केंद्राच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात (Now agaitation in nashik against Farmers Act.) दिल्लीच्या सीमारेषेवर आठ महिन्यांपासून लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी (In support of farmers agaitation On NCR border from last 8 weeks) जिल्हा शेतकरी संघटना समन्वय समितीतर्फे रविवारी सकाळी अकराला नाशिकमध्ये ट्रॅक्टर रॅली (Tractor rally on Sunday) काढण्यात येईल. 

बहुजन शेतकरी संघटना, राष्ट्र सेवादल, अखिल भारतीय किसान सभा, किसान सभा, किसान काँग्रेस, समस्त शेतकरी बांधव यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोल्फ क्लब मैदान येथे सव ट्रॅक्टर एकत्र येतील. त्यासाठी चेहेडी येथे पुणे रोड आणि सिन्नर तालुका, नांदूर नाका येथे औरंगाबाद रोड व परिसर, म्हसरुळ गावात दिंडोरी रोड, आडगाव येथे महामार्गावरील पिंपळगाव आणि ओझर परिसर, पेठ नाका येथे पेठ रोड मार्ग, गंगापूर गाव येथे गंगापूर-गिरणारे परिसर, महिरावणी येथे त्र्यंबकेश्‍वर रोड परिसर, सहा नंबरचा नाका येथे भगूर-लहवित परिसर, विल्लोळी येथे इगतपुरीकडून येणारे ट्रॅक्टर एकत्र येतील. 

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध देशभर करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा व ही व्यवस्था शेतकरी हितासाठी उभी राहिली. 

ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. या व्यवस्थेत अनेक सुधारणा शेतकरी मागत होते. मात्र त्याकडे लक्ष न देता ही व्यवस्था हळूहळू संपेल. किमान संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार नाही. हमी भाव राहणार असे सरकार मोघमपणे सांगत आहे. मात्र बडे व्यापारी, मोठ्या कंपन्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा उल्लेख कायद्यात नाही. शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य देणार असे म्हणत शेतकऱ्यांना बाजाराच्या भरवश्‍यावर सोडून द्यायला सरकार निघाले, असा आरोप ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्ताने जिल्हा शेतकरी संघटना समन्वय समितीतर्फे करण्यात आला आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com