भाजप नेते म्हणतात, मग संजय राऊत यानाही अटक करा! 

आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच न्यायाने आक्षेपार्ह लेखन असललेले सामनाचे होर्डीग्ज लावल्याने सामनाचे संपादक संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे, ॲड राहूल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
BJP Pharande
BJP Pharande

नाशिक  : आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. (Police registered a case against narayan Rane for indecent statement) त्याच न्यायाने आक्षेपार्ह लेखन असललेले सामनाचे होर्डीग्ज लावल्याने (Same principle applicable to Shivsena leader Sanjay Raut)  सामनाचे संपादक संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे, (Devyani Pharande) ॲड राहूल ढिकले (Rahul Dhikle) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी भाजप शिष्टमंडळाने आमचे निवेदन घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी यावे असा आग्रह धरला. त्याला आयुक्तांनी स्पष्ट नकार दिल्याने या कार्यकर्ते, नेत्यांनी काही वेळ धरणे धरले. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने ते चर्चेसाठी आयुक्तालयात गेले. 

शहरात आज ठिकठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयीच्या सामना दैनिकांतील अग्रलेखांचे फलक लावण्यात आले. त्यातील मजकूराबाबत शहर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आमदार फरांदे, ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, हिमगौरी आडके आदीच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली.

शहरात आज ठिकठिकाणी होर्डिंग लागले. पोलिस आयुक्तांना याबाबत कल्पना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कायदा सर्वांना समान आहे त्यामुळे राउत यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाई करावी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यात दगडफेकीत भाजप कार्यालयाचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. त्यांना अटक केलेली नाही. कार्यालय फोडणाऱ्यांना मुंबईत लपविले असून, त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदन करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी अटक करायला थेट रत्नागरीला पोहोचणाऱ्या नाशिक पोलिसांना भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांना अटक करता आलेली नाही. कार्यालय फोडणारे संशयित मुंबईत लपले आहे. पोलिसांना हाताशी धरून राजकारण होत असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला

योगी मुख्यमंत्री नव्हे का!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी २०१८ मध्ये चप्पलाने मारले पाहिजे. या आणि अशा प्रकारचे लिखान केले असल्याने त्यांच्यावर आक्षेपार्ह छपाईबद्दल गुन्हा दाखल का करु नये. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेकडून कायमच आक्षेपार्ह बोलले जाते मग कायदा फक्त भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायलाच आहे का ?असा आरोपही केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही खुलेआम त्यांचे समर्थन करतात. मग मुख्यमंत्र्यांना वेगळा न्याय का ? असा आरोप केला.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com