स्मार्टसिटी; पाच वर्षात जेमतेम सात प्रकल्प पूर्ण 

स्मार्टसिटी कंपनीच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल अनुपस्थित राहिले. त्यापूर्वी त्यांनी महासभेकडे कंपनीच्या कामांची माहिती पत्राद्वारे सादर केली. त्यात पाच वर्षात एक हजार १५२ कोटी रुपयांच्या कामांपैकी ४३ कोटी रुपये किमतीचे सात प्रकल्प पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Smart city
Smart city

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल (Smart city CEO Prakash Thavil Absent in NMC G.B.) अनुपस्थित राहिले. त्यापूर्वी त्यांनी महासभेकडे कंपनीच्या कामांची माहिती पत्राद्वारे सादर केली. त्यात पाच वर्षात एक हजार १५२ कोटी रुपयांच्या (In five years 1152 cr works only 43 cr works complete) कामांपैकी ४३ कोटी रुपये किमतीचे सात प्रकल्प पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्मार्ट सिटीचे २४ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी त्यातील दोन प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप व तीन प्रकल्प सामाजिक दायित्वाच्या निधीतून सुरू आहेत. अकरा प्रकल्प शासनाच्या निधीतून पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी महासभेला सादर केलेल्या पत्रानुसार, स्मार्टसिटी कंपनीअंतर्गत शहरात ५४ प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यासाठी चार हजार ३८६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. स्मार्टसिटी कंपनीच्या एक हजार १५२ कोटी रुपयांच्या निधीतून वीस प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ४३ कोटी रुपयांचे सात प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 
पीपीपी तत्त्वावर ४८१. ७४ कोटी रुपयांचे प्रकल्प होते. यात दहा प्रकल्पांचा समावेश होता. त्यातही २९. ४८ कोटी रुपयांचे दोन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सामाजिक दायित्वाच्या निधीतून पाच प्रकल्प होते. त्या प्रकल्पांची किंमत नऊ कोटी होती. त्यातील ८. ४५ कोटी रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 

विशेष म्हणजे २०१२ ते २०१७ या कालावधीतील मनसेच्या सत्ता काळातील हे प्रकल्प असून, त्या प्रकल्पांचा स्मार्टसिटी कंपनीच्या आराखड्यात समावेश केला आहे. कन्व्हर्जन्सअंतर्गत दोन हजार ७४३ कोटी रुपयांचे १९ प्रकल्प होते. त्यातील ३९४. ३८ कोटी रुपयांचे अकरा प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. या प्रकल्पांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या निधीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्मार्टसिटी निधीचे पूर्ण प्रकल्प 
विद्युत शवदाहिनी, महात्मा फुले कलादालन, कालिदास कलामंदिर व नेहरू उद्यान सुशोभीकरण, गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढणे, स्मार्ट रस्ता. तसेच पीपीपी तत्त्वावरील  पब्लिक बायसिकल शेअरिग, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण झाले.   सीएसआरअंतर्गत  होळकर पुलावर रंगीत-संगीत कारंजा, इतिहास संग्रहालय, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क, राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. 

कन्व्हर्जन्सअंतर्गत प्रकल्प विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढ, युजी केबल, सरकारवाडा नूतनीकरण, वॉटर ऑडिट, नेहरू बायो डाव्हर्सिटी पार्क, भालेकर हायस्कूल मैदानावरील स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण झाले असे पत्रात म्हटले आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com