`बीएचआर` घोटाळा; मुख्य सूत्रधार जितेंद्र खंदारेला इंदूरमधून ताब्यात घेतले

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र खंदारे यास अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांच्या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून जितेंद्र खंदारे यास बेड्या ठोकल्या.
BHR Khandare
BHR Khandare

पुणे  : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र खंदारे (Jitendra khandare arrest from indire by pune police in BHR Scham) यास अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांच्या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Pune EOW squad done this work) सोमवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून जितेंद्र खंदारे (Sanjay Khandare) यास बेड्या ठोकल्या.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबरोबरच शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातही ठेवीदारांची फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २७ नोव्हेंबर २०२० मध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर १७ जून २०२१ रोजी पुन्हा राज्यभरात विविध ठिकाणी छापे घालून आणखी काही जणांना अटक केली होती. या प्रकरणामध्ये न्यायालयात अडीच हजार पानांचे

दोषारोपपत्र सादर केले आहे. 
या प्रकरणी ६१ कोटी ९० लाख ८८ हजार रुपयांचा अपहार, फसवणूक झाल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत १७ आरोपींना अटक केली होती. तर खंदारे हा पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.

वसतिगृहात लपण्याची वेळ
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार खंदारे व सुनील झंवर हे दोघे आहेत. दोघेही गुन्हा घडल्यापासून फरारी आहेत. खंदारे हा मध्य प्रदेशासह अन्य दोन ते तीन राज्यांमध्ये सातत्याने फिरत होता. मात्र मागील काही दिवसांपासून तो मध्य प्रदेशातील इंदूर या शहरातील एका वसतिगृहामध्ये स्वतःची ओळख लपवून राहात होता. त्याबाबतची खबर पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्यास सोमवारी रात्रीच इंदूर येथून ताब्यात घेतले. खंदारेच्या अटकेमुळे या प्रकरणात सहभागी असलेले आणखी काही मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे.

३५ हजार ठेवीदार, ८०० कोटींचा घोटाळा
‘बीएचआर’चे महाराष्ट्र व परराज्यातील मिळून ३५ हजारांहून अधिक ठेवीदार आहेत. या आर्थिक घोटाळ्याच्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामाध्ये आत्तापर्यंत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये ६५० हून अधिक आरोपी असून खंदारे यास अटक केल्यामुळे आरोपींची संख्या आता अठरावर पोचली आहे.

...
बीएचआर आर्थिक घोटाळा प्रकरणात जितेंद्र खंदारे व सुनील झंवर हे दोघे मुख्य सूत्रधार आहेत. त्यापैकी झंवर अजूनही फरारी आहे. तर सातत्याने ठिकाणे बदलणारा खंदारेला सोमवारी रात्री इंदूरमधून अटक केली आहे. त्यास बुधवारी पुण्याला आणून न्यायालयात हजर केले जाईल.
- भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे पोलिस
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com