'जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप'

नगर तालुकाबाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेत. महाविकास आघाडीचे सर्व आरोप खोडून काढले.
'जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप'
nagar taluka krushi utpanna bazar samiti.jpg

नगर तालुका : नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. या संचालक मंडळाला महाविकास आघाडीचा त्यातही शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी गुरुवारी (ता. 9) पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला. या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. हा अपहार मोठा असल्याचा दावा संदेश कार्ले यांनी केला होता. यावर नगर तालुका बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेत. महाविकास आघाडीचे सर्व आरोप खोडून काढले.

या पत्रकार परिषदेला सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, रेवण चोभे, बन्सी कराळे, विलासराव शिंदे, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे, शिवाजी कार्ले, बबनराव आव्हाड, बहिरू कोतकर, उद्धव कांबळे, संतोष कुलट, वसंतराव सोनवणे, बाबासाहेब जाधव आदी संचालक उपस्थित होते.

हेही वाचा...

घिगे म्हणाले, जिल्हा परिषद व बाजार समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांची बाजार समितीवर आरोप करण्याची नैतिकताही नाही. स्वतःच्या पक्षातील नेत्यांना व लोकांना फसविण्याचा धंदा आहे. आम्ही गेल्या चार वर्षांत माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समितीला 12 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यामुळे 250 कोटीची नगर तालुका बाजार समिती जिल्ह्यात दिमाखात उभी आहे. नगर बाजार समिती जिल्ह्यात आग्रेसर आहे.

अशा अग्रेसर असलेल्या बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सत्तेच्या माध्यमातून प्रशासक आणण्याचा हा डाव आहे. महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्याशी जे प्रामाणिक नाहीत ते जनतेशी काय प्रामाणिक राहणार. मागील 15 वर्षांत बाजार समितीतील सभासदांनी यांना बाजार समितीतून दूर लोटल्याने हा खटाटोप चालू आहे. आम्ही जर चौकशी समितीला कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसती तर त्यांनी चौकशी कशी केली असती. सत्तेच्या माध्यमातून हे चौकशी अधिकारी मॅनेज करण्याचा त्यांचा डाव आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीवर केलेले हे 12 आरोप बिनबुडाचे आहेत, असे सभापती घिगे म्हणाले.

हेही वाचा...

उपसभापती म्हस्के म्हणाले, संदेश कार्ले यांना जिल्हा प्रमुख व आमदार होण्याची घाई झाली आहे. म्हणून त्यांनी नगर तालुका शिवसेना ताब्यात घेऊन हुकूमशाही राबवत आहेत. ते पद व पक्षाचा वापर स्वार्थासाठी करत आहेत.

मोकाटेंना मानसोपचाराची गरज
रेवण चोभे म्हणाले, गोविंद मोकाटे यांना मानसोपचाराची गरज आहे. त्यांना कायदा समजतो की नाही. हे सर्व ठेकेदारी करण्यात माहीर आहेत. यातील महाविकास आघाडीचे नेते म्हणविणारे अनेक जण छुप्या पध्दतीने माजी मंत्री कर्डिले यांना येऊन भेटतात. हे कशाचे द्योतक आहे. 

जिकडे सत्ता तिकडे हराळ
आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांनी आपल्या नेतृत्त्वात बदल केला आहे. ज्यांना कै. दादा पाटील शेळके यांनी निवडून आणले ते हराळ रात्रीतून विखे पाटलांच्या गोटात सहभागी झाले. ते कोणत्या पक्षात आहेत. व त्यांचा नेता कोण आहे. हे त्यांनीच सांगावे. त्यामुळेच त्यांच्या गुंडेगावच्या लोकांनी हे पार्सल नगरला पाठविले आहे. ते सांगता आम्ही मंत्र्यांना भेटलो. प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही नोटीस त्या पूर्व नियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप दिलीप भालसिंग यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in