राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होतील : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात म्हणाले, महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्यापक व त्यांना अधिक सक्षम करणारा ठरेल.
राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होतील : बाळासाहेब थोरात
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : महाराष्ट्र हा देशातील प्रगत राज्यांपैकी एक आहे. तरी देखील महाराष्ट्र हे शेती प्रधान अर्थव्यवस्थेचे राज्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना आखण्यास सुरवात केली आहे. यात महसूल विभाग अग्रेसर आहे. यात राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी प्रकल्पाचाही समावेश आहे. या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची माहिती दिली.


थोरात म्हणाले, महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्यापक व त्यांना अधिक सक्षम करणारा ठरेल. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती मोबाईल ॲपमध्ये भरणे सोपे होते. या प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा...

शेतकर्‍यांच्या सात- बारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 'माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा' ही मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

आजपर्यंत 18 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून, त्यावर पिक पाहणी नोंदवली आहे. हा व्यापक प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणार असून, आजच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज पारदर्शक पद्धतीने आपल्या पिकाची नोंदणी करता येणार आहे. 

हेही वाचा...

जमीन महसूल कायद्यानुसार जमिनीच्या उताऱ्यावर पिकाची नोंद करण्याची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य आहे. शिवाय या पीक नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in