सभापती पदी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे तर उपसभापती पदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड जाहीर

नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळात सर्व पदे बदलत आहेत.
सभापती पदी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे तर उपसभापती पदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड जाहीर
amc.jpg

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना काँग्रेसचे चार नगरसेवक व बसपचे चार नगरसेवकांचा पाठिंबा आहे. जून अखेरीचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौरांनी पदभार स्वीकारला. या नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळात सर्व पदे बदलत आहेत.

याचाच एक भाग म्हणून महापौरांनी महिला व बालकल्याण समिती बरखास्त केली. त्या ऐवजी नवीन महिला व बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी सभा घेतली. नवीन सदस्य निवडी झाल्यामुळे आता महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक आज पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

हेही वाचा...

या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पा बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे, शांताबाई शिंदे होत्या. राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीना चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बोरकर होत्या.

हेही वाचा...

निवडणूक प्रक्रियेत सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे बिनविरोध जाहीर करण्याची औपचारिकता बाकी होती. ती जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज पूर्ण केली. बोरूडे यांचे दोन पैकी एक उमेदवारी अर्ज वैध ठरवत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर पुष्पा बोरूडे तर उपसभापती पदासाठी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड जाहीर केली. 

निवड जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळला. तसेच घोषणाबाजी केली. या निवडीनंतर सत्कारासाठी कार्यकर्ते आले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in