शिर्डी देवस्थान पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडे : आमदार आशुतोष काळेंकडे अध्यक्षपद

महाराष्ट्र सरकारने राजपत्र काढून ही कार्यकारिणी जाहीर केली.
Ashutosh Kale.jpg
Ashutosh Kale.jpg

अहमदनगर : आंध्रप्रदेशच्या तिरूपती देवस्थान पाठोपाठ आज शिर्डी देवस्थानची नुतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राजपत्र काढून ही कार्यकारिणी जाहीर केली. शिर्डी देवस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानवर आपला अध्यक्ष असावा अशी महाराष्ट्रातील सर्व मोठ्या पक्षांची इच्छा असते. यंदा हे अध्यक्षपद पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले आहे. Shirdi Devasthan to NCP for the first time: MLA Ashutosh Kale to the presidency

या कार्यकारिणीत एकूण 17 सदस्य असतात. यातील 11 सदस्य अशासकीय निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यातील शिर्डी नगर परिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतात.  11 जणांपैकी तीन अभियंते, दोन विधी तज्ज्ञ, एक महिला व पाच सर्वसाधारण सदस्य असतात. यातील अभियंते म्हणून आमदार आशुतोष काळे, अविनाश दंडवते, सचिन गुजर, विधी तज्ज्ञ म्हणून जगदिश सावंत व सुहास अहेर, महिला म्हणून अनुराधा आदिक तर सर्वसाधारण गटातून राहुल कनाल, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके व एकनाथ गोंदकर यांची निवड जाहीर करण्यात आली. आमदार काळे यांना अध्यक्षपद तर अॅड. जगदिश सावंत यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. 

हेही वाचा...

या निवडीमुळे राष्ट्रवादीने शिर्डी देवस्थानमधील विखे कुटूंबाचे वर्चस्व कमी करत स्वतःचे वर्चस्व वाढवले आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना शिर्डी देवस्थान राष्ट्रवादीने मागून घेतले होते अशी चर्चा होती. त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी देवस्थानवर जाण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे ही निवड होणार असे कयास होते. अखेर आज जाहीर झालेल्या कार्यकारिणीने त्यावर शिक्का मोर्तब केले आहे. या निवडीमुळे कोपरगाव व कोळपेवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत आनंदोत्सव केला. 


महाविकास आघाडीचा वरचष्मा
राज्य सरकारकडून आज शिर्डी देवस्थानवर 11 अशासकीय सदस्य नियुक्त केले गेले. त्यात राष्ट्रवादीचे 5, काँग्रेस 4 आणि शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. अजूनही सहा सदस्यांच्या निवडी जाहीर होणे बाकी आहे. यात शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेसचे 2 सदस्यांची नियुक्ती बाकी आहे. या सहा सदस्यांच्या नावाची घोषणा पुढील आठवडाभरात होणार आहे. यात आमदार आशुतोष काळे यांच्यासह अनुराधा आदिक, सुरेश वाबळे, जयवंत जाधव, महेंद्र शेळके हे राष्ट्रवादीचे, जगदीश सावंत व राहुल कनाल हे शिवसेनेचे तर सचिन गुजर, एकनाथ गोंदकर, सुहास आहेर, अविनाश दंडवते हे काँग्रेसचे आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com