कर्जत जामखेडच्या विकासासाठी आमदार रोहित पवारांनी घेतल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी

मतदार संघातील विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह तीन मंत्र्यांना मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली.
कर्जत जामखेडच्या विकासासाठी आमदार रोहित पवारांनी घेतल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी
rohit pawar.jpg

कर्जत : विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधी आणत आहेत. त्यातून नवनवीन योजना मतदार संघात राबविल्या जात आहेत. या विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली.

कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. 

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. 

हेही वाचा...

ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार रोहित यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे या बाबी रोहित यांनी सीतारामन यांच्या कानावर घातल्या.


शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिले.

हेही वाचा...


पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेत- RVY अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. RVY ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठी एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग येथील नागरिकांना होईल. 

नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असताना देखील समाविष्टीत नसल्याने  करण्यात आले नसल्याने याचा समावेश करण्यात यावा अशी विनंती केली जेणेकरून जिल्ह्याला आणि पर्यायाने कर्जत आणि जामखेडला याचा फायदा होईल. 


केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना आ. रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी विनंती केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in