देवबाप्पा आमच्या सारखा आनंद राज्यात सर्वांना मिळू दे 

हिवरे बाजारमध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे.
Popatrao Pawar.jpg
Popatrao Pawar.jpg

नगर तालुका : कोरोना टाळेबंदीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील शाळा अजूनही उघडलेल्या नाहीत. शाळेत केवळ शिक्षकच हजेरी लावत आहेत आणि खरी शाळा ऑनलाईन भरत आहे. मात्र यात प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. ऑनलाईन शाळेचे अनेक तोटेही समोर येत आहेत. ही बाब लक्षात घेत राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारची शाळा विशेष बाब म्हणून सुरू करण्याची परवानगी मिळविली. त्यानुसार त्यांच्या गावात नियमित शाळा भरत आहे. May God bless everyone in the state with the same happiness as us

हिवरे बाजारमध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे. आज बाप्पाची आरती ही शाळेतील विद्यार्थ्यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यातील, देशातील कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे केली आहे.

हेही वाचा...

पाणलोट क्षेत्रात जगभरात नाव असलेल्या पोपट पवार यांच्या हिवरे बाजार हे गाव कोरोना मुक्त झाले. तेव्हा गावकरी, शाळेतील शिक्षक, पोपटराव पवार यांच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा शाळा सुरू करण्यात आली. 

आमचा दोन वर्षांपासूनचा खेळणे, बागडणे, अभ्यास करणे, जणू आमचे बालपणच हिरावले गेले होते. शाळेत ज्या प्रमाणे ऑफलाईन शिक्षण हिवरेबाजार गावात सुरू आहे तसेच राज्यभर आणि भारत भरातली शाळा लवकरात लवकर सुरू कर. राज्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घाल. असे साकडेच हिवरे बाजार येथील विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाला घातले.  


हिवरेबाजार येथील शाळकरी विद्यार्थ्यांना जो बालपणीचा आनंद शाळेत आल्यामुळे मिळाला आहे तसाच आनंद राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांना मिळावा त्यादृष्टीने सर्वांना काम करण्याची सद्बुद्धी विघ्नहर्त्याने सर्वांना द्यावी अशी अपेक्षा संकट मोचक म्हणून गणरायाकडे केली आहे.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृती समिती.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com