मी भ्रष्टाचार केलेला नाही आणि क्लिपही व्हायरल केलेली नाही

आत्महत्येचा इशारा देणारे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ कालपासून राज्यभरात जोरदार व्हायरल झाला. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र हा ऑडिओ ज्या तहसीलदार देवरे यांचा आहे त्यांचा दुरध्वनी कालपासून बंद आहे.
मी भ्रष्टाचार केलेला नाही आणि क्लिपही व्हायरल केलेली नाही
Joyti devare.jpg

अहमदनगर ः आत्महत्येचा इशारा देणारे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ कालपासून राज्यभरात जोरदार व्हायरल झाला. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र हा ऑडिओ ज्या तहसीलदार देवरे यांचा आहे त्यांचा दुरध्वनी कालपासून बंद आहे. गुरुवार (ता. 19) नंतर त्या कोणालाही दिसल्या नाही. त्यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला मात्र तोही होत नव्हता त्यामुळे त्यांची भुमिकाच गुलदस्त्यात होती. अखेर आज त्यांनी पारनेरच्या पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपली भुमिका मांडली. यात त्यांनी मी भ्रष्टाचार केलेला नाही आणि ऑडिओ क्लिपही व्हायरल केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा हा संदेशही त्यांची मनस्थिती कथन करत आहे. I haven’t corrupted and the clip hasn’t gone viral either

तहसीलदार देवरे यांनी म्हटले आहे, की "मी कोणताही भ्रष्टाचार, घोटाळा अथवा अनियमितता केलेली नाही हे पुन्हा एकदा ठणकावून सांगते आहे. या पलीकडे मी काहीही स्पष्टीकरण देण्याच्या मन:स्थितीत नाही. कृपया मला जे ओळखतात त्यांनी तरी मानसिक त्रास देऊ नये ही नम्र विनंती. याउपर तुमची मर्जी. पुढील स्पष्टीकरण महिला आयोग..महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना व जिल्हाधिकारी महोदय यांचेकडे सादर केले जाईल... मी सावरलेली असुन मी निर्भयपणे माझ्या अडचणी जिल्हाधिकारी महोदय यांना सांगितल्या आहेत. जिल्हाधिकारी महोदय यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. सदरची क्लिप मी व्हायरल केलेली नाही. मी माझे शासकीय कामकाज करित आहे. प्राप्त परिस्थितीत नाउमेद न होता मी पुन्हा जिद्दीने वाट चालत रहाणार आहे." 

हेही वाचा...

त्यांच्या या संदेशामुळे देवरे यांना कोणी अडकवत आहे असे त्याचे म्हणणे आहे का? त्यांच्या भुमिका स्पष्ट असतील तर त्या आपल्या भुमिका का मांडत नाहीत, त्यांनी गुरूवारी (ता. 19) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काय सांगितले, देवरे यांची ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली असे अनेक प्रश्न देवरे यांच्या संदेशातून तयार झाले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in