पारनेरचा बिहार झालाय - सुजित झावरे

ज्योती देवरे यांना दुरध्वनी सकाळपासून बंद आहे. तर आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दुरध्वनी बंद ठेवले आहेत. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
sujit zaware.jpg
sujit zaware.jpg

नगर : ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप आज सकाळपासूनच जोरदार व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे पारनेरच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ज्योती देवरे यांना दुरध्वनी सकाळपासून बंद आहे. तर आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दुरध्वनी बंद ठेवले आहेत. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. Parner has become Bihar - Sujit Zaware

सुजित झावरे म्हणाले, पारनेर तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना काम करणे अवघड झाले आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून पारनेर तालुक्याचा बिहार झाला आहे. देवरे यांनी स्पष्टपणे लोकप्रतिनीधी म्हटले आहे. यावरून कोणाचा त्रास आहे हे स्पष्ट आहे, असे सुजित झावरे यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. 

हेही वाचा...

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. 

देवरे यांनी काल (गुरूवारी) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली होती. तसेच देवरे यांच्या संदर्भात नाशिकच्या महसूल विभागीय आयुक्तांकडे तक्रारीही आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार लंके यांनी शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचाही आरोप झाला होता. मात्र संबंधित कर्मचाऱ्याने असा काही प्रकार झाला नव्हता असे लिखित स्वरूपात सांगितले होत. तहसीलदार देवरे व आमदार लंके यांच्यात काही दिवसांपासून वाद असल्याची चर्चा आज पारनेरमध्ये आहे.

हेही वाचा...

ज्योती देवरे आपल्या क्लिपमध्ये म्हणतात..

प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.

तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे  हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com