पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी धावले जिल्हा प्रशासन - District administration rushed to rescue the flood victims | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी धावले जिल्हा प्रशासन

अमित आवारी
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे.

अहमदनगर ः अहमदनगर शहर व जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व ओढे, नाले व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रात्री जेऊरमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात नागरिकांची मोठी आर्थिक हाणी झाली. शेवगावमध्ये काही जनावरे वाहून गेली. सुमारे 40 कुटुंबे पुरात सापडली होती. 

हेही वाचा...

पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी धावले जिल्हा प्रशासन

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव या गावांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याने शिरकाव केला आहे. या तीनही नद्यांचा संगम वरूर गावात होतो. तेथे तर हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असा गावाचा परिसरात नदीचे पाणी पोचले आहे. नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आले होते.

हेही वाचा...

नगर शहरातील पुरासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली तक्रार

पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे आखेगाव येथील 25 कुटूंब तर वरूर येथील म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले होते. काहींची तर जनावरे वाहून गेली. ही सर्व कुटुंब भयभीत झाली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली.  परिसरातील सर्व पिके पाण्यात गेली असून घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे. 

अखेर त्याचा वाचविला प्राण
ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथील भगिरथी नदीवरील पुलावर पहाटे तीन ते चारच्या सुमारास पुला वरून पाणी जात होते. अशा स्थितीत एकाने या पुलावरून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा ट्रक अडकला. पुराचे पाणी ट्रकच्या वर आले. त्याने ग्रामस्थांकडे मदतीची याचना केली. तो सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ट्रकवरच उभा होता. अखेर सकाळी ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले.

50 जणांचे वाचले प्राण
नंदिनी नदीला पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर व पागोरी पिंपळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वरुर, ठाकुर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बचावकार्यासाठी नेवासा पैठण येथून बोट मागविण्यात  आली आहे. आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने घरात पाणी शिरले आहे, शेकडी घरे पाण्यात आहेत बाबासाहेब पालवे यांची वस्ती पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबले आहेत. आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात महसूल व पोलिस प्रशासनाला यश आले असून 100 नागरिक अजूनही अडकले आहेत.  

जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले स्वतः शेवगावमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ते पूर स्थितीची व झालेल्या नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे संदर्भातील सूचना देत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख