भाजपला शह देताना राष्ट्रवादीने काँग्रेस - शिवसेनेलाही सोडले नाही

आता संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांवर प्रशासक नेमणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. योगायोगाने हे खातेही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे.
Shalini patil1.jpg
Shalini patil1.jpg

बीड : कोरोना (Corona) विषाणू संसर्गामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या आणि त्यावर खासगी प्रशासक नेमण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांना न्यायालयाने चाप लावला. परंतु, आता मुदत संपलेल्या सेवा सहकारी सोसासायट्यांवर प्रशासक नेमणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी विरोधी भाजपसोबतचे हिशोब चुकते करत आहे. पण, याच वेळी काँग्रेसलाही ‘दे धक्का’ची खेळी राष्ट्रवादीने साधली आहे.  (While giving support to BJP, NCP did not leave Congress-Shiv Sena either)

मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात झाली. राज्यात हजारो ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. परंतु, कोरोनामुळे निवडणुका शक्य नव्हत्या. त्यामुळे ग्रामविकास स्वत:कडे असलेल्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पक्षीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरु केल्या. या निमित्ताने राष्ट्रवादी नेत्यांच्या दारात इच्छुकांची गर्दी वाढत असताना राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना न्यायालयानेच चाप लावला. अखेर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर निवडणुका झाल्या.

दरम्यान, आता संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांवर प्रशासक नेमणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. योगायोगाने हे खातेही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. जिल्ह्यात नऊशेंपैकी शेकडो सेवा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी जिल्ह्यात सत्तेचा वाटा राष्ट्रवादीच्याच ताटात आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदार यादीसाठी सेवा सोसायट्यांचे ठराव घेताना राष्ट्रवादीच्या मंडळींच्या ही बाब लक्षात आली आणि मग पक्षीय कार्यकर्त्यांची प्रशासकीय मंडळावर नेमणुकांची प्रक्रीया सुरू झाली. राष्ट्रवादीने प्रशासकीय मंडळ नेमताना प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपला नमोहरम करताना महाविकास आघाडीतीलच शिवसेना व काँग्रेसलाही हात दाखविला हे महत्वाचे.

जिल्ह्यातील गेवराई व बीडमध्ये राजकीय ताकद असलेल्या शिवसेनेला आणि केज व अंबाजोगाईत ताकद असलेल्या काँग्रेसलाही वाटा मिळणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. बीडमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय प्रतिष्ठा वापरुन काहीसा वाटा शिवसेनेच्या पदरात पाडून घेतला. परंतु, केज तालुक्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षे असलेल्या सोनीजवळा व कासारी या सेवा सहकारी सोसायट्यांवरही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते प्रशासक म्हणून बसविले आहेत.

रजनी पाटील या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या, हिमाचल काँग्रेसच्या प्रभारी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या आहेत. आता त्यांचे स्थानिक पातळीवरील घडामोडींवर लक्षच नाही कि त्यांना शह दिला हे कळण्यापलिकडे आहे. तसे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या रजनी पाटील यांचे राष्ट्रवादीतील राज्य नेतृत्वासह पवारांशीही चांगले ऋणानुबंध आहेत. तरीही केज तालुक्यात भाजप नेत्यांना नमोहरम करताना पाटलांनाही राष्ट्रवादीने दिलेला शह हा स्थानिक राष्ट्रवादीमुळे की त्यांच्या दुर्लक्षामुळे हे पहावे लागणार आहे.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com