असा केला इंधन दरवाढीचा निषेध ! पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविल्या गोवऱ्या

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेस व विविध सेलच्या वतीने बुधवारीढोल-ताशांच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत सायकल, बैलगाडी, हातगाडी फेरी काढण्यात आली.
Narendra modi.jpg
Narendra modi.jpg

अकोले : केंद्र सरकारने इंधन दरवाढीसह डाळ, तेलाचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी करीत तालुका काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना गोवऱ्यांची भेट पाठविण्यात आली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (Protest against fuel price hike! Govarya sent to Prime Minister Narendra Modi)

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेस व विविध सेलच्या वतीने बुधवारी ढोल-ताशांच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत सायकल, बैलगाडी, हातगाडी फेरी काढण्यात आली.

या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, राज्य सरचिटणीस उत्कर्षा रूपवते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार तांबे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने देशाची बिकट अवस्था करून ठेवली आहे. पंतप्रधान मोदी हुकूमशाही पद्धतीने देश चालवीत असून, त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आहे. महागाईने सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. सरकारचा भांडाफोड जनतेसमोर करणार आहोत.’’

नवले म्हणाले, ‘‘सरकारने सात वर्षांत ३७५ वेळा इंधन दरवाढ केली. यातून नफेखोरी करून स्वतःची तिजोरी भरली आहे. ही समाजाची लूट असून, देशद्रोह आहे.’’
 

हेही वाचा..

व्हॉल्व्हदुरुस्तीमुळे संगमनेरला उद्यापासून दिवसाआड पाणी

संगमनेर : शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा मुख्य व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला आहे. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार असल्याने, शनिवारपासून (ता. १७) शहराला होणारा दैनंदिन पाणीपुरवठा दिवसाआड व कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली.

या दुरुस्तीसाठी एक आठवडा लागण्याची शक्यता असल्याने, या कालावधीत निळवंडे धरणातून संगमनेर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संगमनेर शहर व उपनगरांत एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन, योग्य प्रमाणात व पुरेसा पाणीसाठा करावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा. रस्त्यावर पाण्याचा सडा मारू नये, तसेच नळांना तोट्या बसवून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेत नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, पाणीपुरवठा समिती सभापती मालती डाके, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com