उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा आनंदोत्सव..पंढरपुरात विठ्ठलाला जलाभिषेक 

उजनीपाणी बचावसमितीने संत नामदेव पायरीजवळ विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीलाअभिषेक घातला.
4jayant_20patil_25.jpg
4jayant_20patil_25.jpg

पंढरपूर : पंढरपूर उजनी धरणातून Ujani Dam इंदापूर  Indapur मधील गावांना पाणी नेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने जलाभिषेक करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. Ujani Dam Water Rescue Struggle Committee Anandotsav in Pandharpur

उजनी धरणातून इंदापूरला Indapur पाणी देण्याचा निर्णय काल रद्द झाल्यानंतर आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने संत नामदेव पायरी जवळ चंद्रभागा नदीचे पाणी कावडीने आणून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीला माऊली हळणवर, दीपक वाडदेकर, दीपक भोसले यांनी अभिषेक घातला.

उजनी धरणाच्या पाण्याचे १००% वाटप झाले आहे. तरीही सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी नेण्याचा आदेश काढला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी २२ एप्रिलला २०२१ ला काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील गावांना हे पाणी जाणार नसल्याचे पाहिले पाऊल पडले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचना पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पुण्यातून वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी सुमारे ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या योजनेस २२ एप्रिल २०२१ रोजी तत्व:ता मान्यता देवून योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वपक्षीय आमदार व पुढाऱ्यांनी तीव्र विरोध करुन राज्यमंत्री दतात्रेय भरणे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करुन निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. 
 
निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांनी सांगितले की, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाल होता. तालुक्यातील २२ गावांतील तिसरी पिढी पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत. धरण उशाला कोरड घशाला अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची परस्थिती असून या उजनीच्या पाण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com