विजय मल्ल्याला न्यायालयाकडून झटका..भारतीय बॅंका संपत्ती जप्त करुन कर्ज वसूल करणार..

मल्ल्याची दिवाळखोरीची याचिका न्यायालनाने फेटाळली आहे.
1Vijay_20Mallya_1.jpg
1Vijay_20Mallya_1.jpg

मुंबई : भारतीय बॅँकांची तब्बल ९०० कोटी रुपयांची फसवणूक करून विजय मल्या Vijay Mallya  इंग्लंडमध्ये पळून गेला आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने विजय मल्ल्या याला झटका दिला आहे. मल्ल्याची दिवाळखोरीची याचिका ब्रिटन न्यायालनाने फेटाळली आहे.  त्यामुळे आता आपले बुडविलेले पैसे वसुल होण्याची आशा स्टेट बॅंक ऑफ इंडियाला आहे. Vijay Mallya Was Struck Down By  London Court His Bankruptcy Petition Was Rejected

उच्च न्यायालयाचे चीफ इन्सॉल्वेंसी अँड कंपनीज कोटार्चे न्यायमूर्ती मायकल ब्रिग्स यांनी भारतीय बँकांच्या बाजूने हा निर्णय दिला आहे. विजय मल्ल्या याच्या संपत्तीला सुरक्षा कव्हर प्रदान करण्यासाठी कोणतीही पब्लिक पॉलिसी उपलब्ध नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मल्याच्या संपत्तीवर असलेले सुरक्षा कवच हटविले आहे. त्यामुळे आता बॅँका मल्याची भारतातील संपत्ती जप्त करून कर्ज वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

आपल्या आलिशान राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेल्या विजय मल्ल्याकडे आता वकीलाला देण्यासाठी पैसै नाही. वेळेत पैसे मिळाले नाही तर खटला चालविण्यास वकीलाने नकार दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी)  विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता यापूर्वी जप्त केली आहे.  

"आपल्यावर जे कर्ज आहे तो जनतेचा पैसा आहे. त्यामुळे बॅक आपल्याला दिवाळखोर जाहीर करु शकत नाही. भारतीय बॅंकांनी माझ्यावर केलेल्या दिवाळीखोरीच्या याचिका या कायद्याच्या चैाकटीबाहेरील आहे,"  असा दावा त्याने केला आहे. विजय मल्याची किंगफिशर ही मद्यउत्पादक कंपनी आहे.  ही कंपनी  आता बंद झाली आहे.  कंपनीला दिलेले कर्ज बॅंका आता त्यांची भारतातील संपत्ती विकून वसूल करु शकतील.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात मागणी केली होती. 

हेही वाचा  : Maratha reservation : संभाजीराजे लवकरच भूमिका मांडणार... "कोरोनाला रोखा..जगलो तर, आरक्षण लढा शक्य.."
 
मुंबई :  "मराठा आरक्षणावर वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे मी लवकरच भूमिका जाहीर करणार आहे. थोड्या दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार असून माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका असेल, " असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.  संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्याचे अधिकार काढून घेतले आहे का, केंद्र सरकारने घेतलेली भूमिका यावर सगळं बोलणार आहे.  पक्षांची भूमिका ही त्यांची भूमिका असेल, माझी वैयक्तिक भूमिका असेल. आत्ताही माझी भूमिका सामंजस्य आहे. मराठा समाजात संभ्रमाअवस्था आहे, त्यामुळे काल टि्वट केलं होतं.  मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे त्यावर मी बोलणार आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com