लावणी सम्राज्ञी हातावर बांधणार घड्याळ ; अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मी आता पर्यंत कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे
Sarkarnama (96).jpg
Sarkarnama (96).jpg

पुणे : ‘कारभारी दमानं’ म्हणत रसिकांना साद घालणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर Surekha Punekar राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे १६ तारखेला राष्ट्रवादी कॉग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. '

'मी आता पर्यंत कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहे,'' असे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सुरेखा पुणेकर यांनी यापूर्वी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. महिनाभरातपूर्वी सुरेखा पुणेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्य पूर्वी निधन झाले.त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहेत. 

'इंपेरिकल डेटा गोळा करा, नाहीतर ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल' 
''महाराष्ट्रात लोककलेचा प्रसार केला. हजारो लोककलावंत आज महाराष्ट्रात तळागाळात आहे. आम्ही लोकांचं मनोरंजन करतो. आज तमाशा कलावंत आणि लावणी कलावंतांचे हाल आहेत, आमचा प्रश्न एखादा आमदार किंवा खासदार का उचलत नाही. त्यामुळे आमच्यातूनच एखादा प्रतिनिधी पुढे येणे गरजेचे आहे, त्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे, अशा भावना सुरेखा पुणेकर यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केल्या होत्या.  

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडेही त्यांनी यापूर्वी  निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुरेखा पुणेकर यांना विधान परिषदेवर आमदार व्हायची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कही केला होता. सुरेखाताईंनी वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले. बैलागाडीचा तमाशा आणि पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणीची सुरुवात केली, आज मराठी रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवित आहेत.
  Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com