पवार, फडणवीस, मुंडे यांची फेसबुकवर बदनामी ; एकावर गुन्हा दाखल  

राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
Sarkarnama (91).jpg
Sarkarnama (91).jpg

पुणे : सोशल मीडियावर राजकीय मंडळी, महिला यांच्यावर वादग्रस्त मजकूर शेअर करुन बदनामी करणे एका तरुणांचा अंगलट आले आहे. त्याच्याविरोधात पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे  Dhananjay Munde व करुणा शर्मा यांच्या नावांचा वापर करण्यासह इतर महिलांबाबत फेसबुकवर बदनामीकारक छायाचित्र व मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांबाबत त्याने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे.  त्याच्या मजकुरावर प्रतिसाद देणाऱ्याबाबतही अश्लिल भाषेमध्ये उलट प्रतिसाद दिला होता. 

राहुल मुळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरु होता. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डि. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार,  राहुल मुळे याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन मुंडे व शर्मा यांच्यासह अन्य महिलांबाबत फेसबुकवर सातत्याने वेगवेगळ्या अश्लिल भाषेमध्ये मजकूर टाकला होता.  त्याच्या मजकुरावर प्रतिसाद देणाऱ्याबाबतही अश्लिल भाषेमध्ये उलट प्रतिसाद दिला होता. 

काही समाजातील लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारचाही मजकूर  टाकून चितावणीखोर भाष्य केले आहे. याबरोबरच त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्याबद्दलही फेसबुकवर मजकुर प्रसारित केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन अन्य महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून वादग्रस्त विधानाची पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्यांची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत शिवाजीनगर येथील सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com