Dyspचे महिला कॉन्स्टेबल सोबत स्वीमिंग पूलमध्ये अश्लील चाळे ; video viral

व्हिडिओ तिच्या पतीने पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
Sarkarnama (89).jpg
Sarkarnama (89).jpg

नवी दिल्ली : राजस्थानच्या उदयपुर मधील एका रिसॉर्टमध्ये महिला पोलिस शिपाई सोबत डीएसपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वीमिंग टॅंकमध्ये डीएसपी आणि महिला पोलीस शिपाई अश्लील चाळे करत आहेत. सोबत महिलेचा सहा वर्षांचा मुलगा आहे. हा  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी उदयपूर येथील रिसॉर्टवर छापेमारी करत निंलबित डीएसपी हिरालाल सैनी DySP Hiralal Saini याला अटक केली आहे. Child Pornography

महिला पोलीस शिपाई, आणि डीएसपी हिरालाल सैनी याला राजस्थानचे पोलिस महासंचालक एमएल लाठर यांनी निंलबित केले आहे. दोघांची चैाकशी सुरु आहे. त्या महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेने हा व्हिडिओ स्टेटस् वर ठेवला होता. तो व्हिडिओ तिच्या पतीने पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. १३ मिनिटांनंतर हा व्हिडिओ स्टेटस् वरुन हटविण्यात आला होता. हा व्हिडिओ २ मिनिटे ३८ सेंकदाचा आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल  viral video होत आहे. या प्रकरणी राजस्थान बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संगीता बिनीवाल यांनी पोलिस महासंचालकांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उदयपुर येथील अनंता रिसोर्ट येथील ही घटना आहे. हिरालाल सैनी याला उदयपुरच्या अंबामाता पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जयपूर येथे नेण्यात आले आहे. यापूर्वीही हिरालाल सैनी याचा अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.   


हेही वाचा : राणेंचा यु-टर्न, म्हणाले, 'तर आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंचं स्वागत करू'
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळाच्या chipi airportउद्घाटनावरुन राजकीय वातावरण चांगलेच  तापले.  दिल्ली येथे नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cm thackeray यांना बोलविण्याची गरज नसल्याचे मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्यूत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना धक्का दिल्यीची चर्चा राजकीय वर्तुळात सुर झाली आहे. आता नारायण राणे narayan rane यांनी यु-टर्न घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com