आम्हाला पूर्वाताई वळसे-पाटलांना विधानसभेत पाठवायचंय 

तीच इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.
Sarpanch of Kendur told Purva Walse Patil to call for the inauguration function because
Sarpanch of Kendur told Purva Walse Patil to call for the inauguration function because

शिक्रापूर (जि. पुणे) : माजी गृहराज्यमंत्री दिवंगत बापूसाहेब थिटे यांचे गाव असलेल्या केंदूर (ता. शिरूर) येथील सरपंच-उपसरपंच तसेच, ग्रामपंचायत सदस्यांनी १ कोटी १३ लाखांच्या विकासकामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा यांच्या हस्ते आयोजित केला होता. काही कारणाने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्या आल्या नाहीत तरी त्यांच्यासाठीच्या कार्यक्रमाचा घाट घालण्याचे कारण सरपंच सुवर्णा सतीश थिटे आणि उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पूर्वाताईंना आम्हाला विधानसभेत पाठवायचे आहे. हे आम्ही लवकरच गृहमंत्री वळसे पाटील यांना सांगणार आहोत. तीच इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. (Sarpanch of Kendur told Purva Walse Patil to call for the inauguration function because)

दरम्यान, आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा केंदूरच्या सरपंच आणि उपसरपंचांनी व्यक्त केल्याची भावना या भागातील चर्चेतून पुढे येत आहे. 

शिरुर पंचायत समितीचे सभापती, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, गृहराज्यमंत्री व बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार अशी पदे भूषविलेले बापूसाहेब थिटे यांचे गाव केंदूर. शिरूरच्या राजकारणावर जी दोन गावे प्रभाव टाकतात, त्यातील तळेगाव ढमढेरे आधी दखल घेतली जाते ती, केंदूरची. या गावातून सदाशिवराव थिटे, भाऊसाहेब साकोरे हे शिरूर पंचायत समितीचे सभापती, तर राजेंद्र रासकर हे उपसभापती होते. विद्यमान उपसभापती सविता पऱ्हाडही केंदूरच्याच. केंदूर आणि तळेगाव ढमढेरे या दोन गावांतील स्थानिक राजकारणावरुन तालुक्याच्या राजकारणाचा अंदाज येतो, असे अनेकदा म्हटले जाते. त्याचीच प्रचिती केंदूरमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. 

केंदूर येथे स्थानिक निधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा एकुण १ कोटी १३ लाखांच्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन करण्यासाठी सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्यांनी पूर्वा वळसे-पाटील यांना निमंत्रित केले. पूर्वा वळसे यायच्या म्हणून गावात फ्लेक्सही लागले. मात्र, तब्बेत बरी नसल्याने त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विविध विकासकामांचा उद्‌घाटनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सभापती देवदत्त निकम, उपसभापती सविता पऱ्हाड व जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, बाजार समिती संचालक मानसिंग पाचुंदकर, अमोल जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. 

पूर्वा वळसे कार्यक्रमाला न आल्याने स्थानिक पदाधिकारी काहीसे नाराज झाले. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले की, सर्व विकास कामांचे उद्‌घाटन गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कन्या पूर्वा यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र, त्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. मात्र एक सांगतो, पूर्वाताईंना आम्हाला विधानसभा वा विधान परिषदेत पाठवायचं. त्याच्या तयारीचा श्रीगणेशा या कार्यक्रमाने आम्हाला करायचा होता. मात्र, त्या आल्या नाहीत. आम्ही केंदूरचे ग्रामस्थ पूर्वाताईंकडे भावी आमदार म्हणूनच पाहतो. गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडेही लवकरच तशी इच्छा आम्ही व्यक्त करणार आहोत. 


फ्लेक्सवर विधानसभेच्या प्रतिमेसह पवार, वळसे पाटील आणि पूर्वा यांचे फोटो!   

पूर्वा वळसे-पाटील यांच्या स्वागताची तयारी करताना केंदूर ग्रामस्थांनी त्यांच्या छायाचित्रांचे भले मोठे फ्लेक्स गावात लावले होते. त्या फ्लेक्सवर ज्येष्ठ नेते शरद पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या फोटोसह विधानसभेची प्रतिमाही दर्शविण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com