अजितदादा, दिलीप मोहितेंचा बंदोबस्त करा; अन्यथा शिवसेनेला मुभा द्या  

त्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहू.
Sanjay Raut's warning to NCP on the politics of no-confidence motion in Khed
Sanjay Raut's warning to NCP on the politics of no-confidence motion in Khed

पुणे : राज्यात सरकार व्यवस्थित चालले असताना पुणे जिल्ह्यात कुरघोडी करणारे लोक आहेत. त्यांचा बंदोबस्त पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ करावा. अजितदादा पवार यांचेही खेडचे आमदार दिलीप मोहिते ऐकत नसतील, तर मग त्यांनी शिवसेनेला मुभा द्यावी. खेडपुरतं किंवा पुणे जिल्हापुरतं काय करायचं, ते आम्ही बघू, असे खुले आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. (Sanjay Raut's warning to NCP on the politics of no-confidence motion in Khed)

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार संजय राऊत हे आज (ता. ४ जून) राजगुरुनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला खुले आव्हान दिले.

खासदार राऊत म्हणाले की, खेड तालुक्यात ज्या राजकीय घटना सध्या घडत आहेत. त्या संबंधितांना लहान वाटत असतील मात्र. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असतात. ती घटना लहान नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. राज्य पातळीवर कुठेही मतभेद दिसत नाहीत. मात्र, पुणे जिल्ह्यात विशेषतः खेड तालुक्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. जिथं एका पक्षाची सत्ता आहे, मग ती पंचाय समितीची का असेना. ती सत्ता खत्म करण्यासाठी त्या पक्षाची माणसं फोडायची आणि पळावयाची,  हे कोणत्याही आघाडी धर्मात बसतं. 

खेडमधील घटनेचे खापर आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांच्याशी आमचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. पंचायत समितीचा विषय आम्ही प्रतिष्ठेचा केलेला आहे. आम्हालाही माणसं फोडता येतात. पण, एकदा आपण नियमानं बांधलो गेलो असल्याने आम्ही तसं करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आमची शरद पवार यांच्यावरसुद्धा श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत अगोदर जाऊ. त्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहू, असा इशाराही राऊत यांनी दिला.

ते म्हणाले की महाराष्ट्रात सरकार व्यवस्थित चालले असताना पुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या कुरघोडी करणारे लोक आहेत. त्यांचा बंदोबस्त पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ करावा. अजितदादा पवार यांचेही आमदार मोहिते ऐकत नसतील, तर मग त्यांनी शिवसेनेला मुभा द्यावी. खेडपुरतं आणि पुणे जिल्हापुरतं काय करायचं ते आम्ही बघू. जो संघर्ष आम्ही टाळत आलोय, तो संघर्ष आम्हाला नकोय.

तो करार आम्ही युती असेपर्यंत पाळला

शिवसेना-युतीच्या काळातही भांड्याला भांडं लागायचं. पण, आमच्यात एक अलिखित करार होता की एकमेकांची माणसं पळवून आणि फोडून सत्ता स्थापन करायची नाही. असा प्रसंग निर्माण होईल, तेव्हा एकमेकांना त्या संदर्भात माहिती देऊन चर्चा करायची, असा हा अलिखित करार आम्ही युती असेपर्यंत पाळला. जशी आमची अपेक्षा आहे. तशीच आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com