प्रशांत परिचारकांच्या कारखान्याने केवळ आठ तासांत उभारला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

तीच परंपराआपण पुढे चालवित आहोत.
The Pandurang factory at Sreepur set up an oxygen generating plant in just eight hours
The Pandurang factory at Sreepur set up an oxygen generating plant in just eight hours

श्रीपूर (जि. सोलापूर) : स्किड माउंटेड पद्धतीने हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील श्री पांडुरंग कारखान्याने केवळ आठ तासांत उभारला आहे. सुपंत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आज (ता. ४ जून) करण्यात आले. (The Pandurang factory at Sreepur set up an oxygen generating plant in just eight hours)

आमदार परिचारक म्हणाले, राज्यात सहकारी क्षेत्रात स्किड माउंटेड पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे. नाशिक येथील साई कन्वेन्शन यांच्या माध्यमातून उभारलेल्या या प्रकल्पाचे सर्व तंत्रज्ञान तैवान येथून आयात केले आहे. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे. गेल्या पंधरवड्यातच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता. मात्र, तौक्ते वादळामुळे अडचण आली. त्यानंतर विमानाने ही मशिनरी आणून केवळ आठ तासांत त्याची उभारणी केली आहे. येथून निर्माण झालेल्या आक्सीजनच्या गुणवत्तेची चाचणी झाली असून हा ऑक्सीजन दवाखान्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.  

निसर्गाने आपल्याला फुकट ऑक्सिजन दिला आहे. मात्र, आजवर आपल्याला त्याची किंमत कळाली नव्हती. या काळात ऑक्सीजनची कमतरता जाणवली. गेल्या काही दिवसांत राज्यात सतराशे ते साडेसतराशे टन ऑक्सीजनची दवाखान्याला गरज होती. तेवढी निर्मिती आपल्याकडे होत नव्हती. या परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. वास्तविक राज्याच्या जडणघडणीत साखर कारखान्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची जबाबदारी कारखान्यांनी नेहमीच घेतली आहे, असे परिचारक म्हणाले.

सुधाकरपंत परिचारकांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवाराने आपत्तीच्या वेळी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. तीच परंपरा या माध्यमातून आपण पुढे चालवित आहोत. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असा आदेश साखर संघ व साखर आयुक्तांनी काढला. मात्र, पांडुरंगच्या व्यवस्थापनाने त्यापूर्वीच निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सहकारी उद्योगातील स्किट माउंटींगचा हा पहिलाचा प्रकल्प पांडुरंग कारखान्याने कार्यान्वित केला आहे, असे माहिती प्रशांत परिचारक यांनी दिली. 

या वेळी मंचावर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकरराव मोरे, दाजी पाटील, दिनकर नाईकनवरे, प्रणव परिचारक, रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांच्यासह संचालक, अधिकारी, शेतकरी, कामगार उपस्थित होते. 

प्रकल्प उभारणीसाठी योगदान देणारे अनिल मोरे (नाशिक), अमित गॅस एजन्सीचे सचिन साखळकर यांचा आमदार परिचारक यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सुंपत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबत माहिती दिली.

प्रकल्पाबाबतची माहिती
►प्रतिदिन २५ एमक्यूब उत्पादन क्षमता आहे. 
►साधारणतः ५५ के ६० लाख रूपये खर्च 
►त्यातील ४० ते ४५ लाख रूपये मशिनरींसाठी खर्च 
►तैवान येथून मशिनरींची आयात 
►केवळ आठ तासांत या प्रकल्पाचे काम पूर्ण 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com