मित्राचीच फसवणूक करणाऱ्या मंगलदास बांदलांना पोलिस कोठडी 

बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, गोविंद शंकर झगडे व मोहन जयसिंग चिखले यांना तपासाच्या गरजेनुसार अटक केली जाऊ शकते.
Pune Zilla Parishad's Former sabhapati Mangaldas Bandal has been remanded in police custody
Pune Zilla Parishad's Former sabhapati Mangaldas Bandal has been remanded in police custody

शिक्रापूर (जि. पुणे)  ः मित्राचीच फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी (ता. २६ मे) शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना शिरूर न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या आर्थिक स्वरुपाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील इतर संशयित आरोपी असलेले बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, गोविंद शंकर झगडे व मोहन जयसिंग चिखले यांना तपासाच्या गरजेनुसार अटक केली जाऊ शकते, असे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. (Pune Zilla Parishad's Former sabhapati Mangaldas Bandal has been remanded in police custody) 

या प्रकरणातील फिर्यादी तथा मंगलदास बांदल यांचे मित्र दत्तात्रेय रावसाहेब मांढरे यांच्या येथील बाजार पेठेतील २ व्यापारी गाळ्यांचे कुलमुखत्यारपत्र करून त्याच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढून त्यांची बांदल यांच्यासह वरील संशयित आरोपींनी फसवणूक केली. या प्रकरणी बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांना गहाण खत करताना सहभागी करत गोविंद शंकर झगडे व मोहन जयसिंग चिखले यांच्यासह संगनमत करुन सुमारे सव्वा लाखांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा कार्यकाल २००४ ते २०२१ एवढा मोठा आहे. मांढरे यांच्या फिर्यादीवरुन बांदल यांच्यासह इतर संशयित आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बुधवारी दुपारी बांदल यांना शिक्रापुरात अटक झाली.

दरम्यान, मागील आठवड्यात पाणीचोरीच्या गुन्ह्यात  बांदल यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून ते शिक्रापूर पोलिसांपुढे हजर झाले असतानाच त्यांना मांढरे यांच्या तक्रारीवरुन अटक करण्यात आली आहे. त्यांना आज शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. 

न घाबरता पोलिसांकडे तक्रार द्या 

दरम्यान, बांदल यांच्यावर बुधवारी (ता. २६ मे) दाखल झालेला गुन्हा हा आर्थिक फसवणुकीच्या स्वरुपातील आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात येवून त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. त्यांची कसून चौकशी करुन उर्वरित संशयित रेखा बांदल, गोविंद झगडे व मोहन चिखले यांच्यावर कारवाई केली जाईल. गरजेनुसार त्यांना अटकही करण्यात येईल. या प्रकरणाच्या तपासावर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच सर्वच मुख्य अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे बांदलांच्या बाबतीत कुणाच्या तक्रारी असतील, तर न घाबरता थेट पोलिसांकडे देण्याचे आवाहनही शेडगे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com