माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक - Pune Zilla Parishad's Former Sabhapati Mangaldas Bandal arrested | Politics Marathi News - Sarkarnama

माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

परस्पर आठ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली.

शिक्रापूर/ पुणे  : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना आज (ता. २६ मे) एका फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) अटक (Arrest) केली.

मागील आठवड्यात त्यांच्यावर सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून पाणीचोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात बांदल यांना जामीन मिळाला. पण, आज आणखी एका फसवुणकीच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली. (Pune Zilla Parishad's Former Sabhapati  Mangaldas Bandal arrested)

याबाबतची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, दत्तात्रेय रावसाहेब मांढरे यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे जमीन क्षेत्र व दोन व्यापारी गाळे यांचे कुलमुखत्यारपत्र करून त्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून परस्पर आठ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली आहे, असे फिर्यादीत मांढरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मागील आठवड्यातील एका पाणीचोरीच्या गुन्ह्यात बांदल हे अटकपूर्व जामिनीसाठीची कागदपत्रे शिक्रापूर पोलिसांकडे सुपूर्त करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

हेही वाचा : भरणेमामांची गाडी काळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही
 
दरम्यान, सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरून जमिनीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न मंगलदास बांदल यांनी केला होता. त्या प्रकरणी गेल्याच आठवड्यात मंगलदास बांदल आणि त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल याांच्यविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांना आज जामीन मिळाला होता. 

या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव तनपुरे यांनी बांदल यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्यांचे भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरून नेत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला होता. दरम्यान, मंगलदास बांदल यांची गेल्या वर्षी एका खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख