भरणेमामांची गाडी काळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही

कोणत्याही परिस्थितीत इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा शासकीय अध्यादेश आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
Guardian Minister Dattatreya Bharne's car will be blacked in Solapur : Atul Khupse
Guardian Minister Dattatreya Bharne's car will be blacked in Solapur : Atul Khupse

मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूरच्या (Solapur) पाण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Guardian Minister Dattatreya bharane) यांच्या मनात काळं पाप आलं. त्या पापातूनच उजनी धरणातून (Ujani dam) इंदापूरला (Indapur) पाच टीएमसी पाणी नेणारे पालकमंत्री भरणेमामांची गाडी आम्ही सोलापुरात काळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे (Atul Khupse) यांनी दिला आहे. (Guardian Minister Dattatreya Bharne's car will be blacked in Solapur : Atul Khupse)
            
मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा शहरालगतचा टोल नाका येथे उजनी जलाशयातून इंदापूर देण्यात येणारे पाच टीएमसी पाण्याबाबतचा अध्यादेश रद्द करा. त्याबाबतचा शासकीय अध्यादेश काढा या मागणीसाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी खुपसे बोलत होते.

वेळी सचिव माऊली भाऊ हळणवर, दीपक भोसले, बंडू गरड, सदस्य धनाजी गडदे, आप्पासाहेब मेटकरी, माऊली बंडगर, शिवाजी टकले, धर्मा मरीआईवाले, सचिन पांढरे, यल्लाप्पा पडवळे, अक्षय देवकते, भागवत सोमुत्ते, राहुल टेकनर, विजय ताड व अन्य शेतकरी उपस्थित होते.

अतुल खुपसे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. गेली 25 वर्षे पाण्याच्या आशेवर या भागातील जनतेने मतदान केले. मात्र, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेदभाव केल्यामुळे पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांसाठी दोन टीएमसी पाणी आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली देण्याचा डाव केला जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या गावापर्यंत पोहोचले आहेत. उद्या (ता. २७ मे) त्यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर आंदोलन करून उजनी धरणातून पाणी उचलण्याबाबतचा रद्द केलेला लेखी आदेश घेऊनच येतील, असेही अतुल खुपसे यांनी दिला आहे. 

सचिव माऊली हळणवर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याला मंत्रिपद दिलं नाही, तर या अगोदर देण्यात आलेले दोन पालकमंत्री पळून गेले. आत्ता सोलापूरकरांच्या उरावर इंदापूरचे दत्तात्रेय भरणे कोणता सूड उगवण्यासाठी आलेत हे कळायला मार्ग नाही. उद्या जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा शासकीय अध्यादेश आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com