One commits suicide by killing wife and child .jpg
One commits suicide by killing wife and child .jpg

लॉकडाउनने रोजीरोटी हिरावली अन् त्याने पत्नी व मुलाचा खून करुन केली आत्महत्या

हणुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा अर्जुण शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

लोणी काळभोर (पुणे) : पत्नी व एक वर्षे वयाच्या लहाण मुलाचा खुन करुन, ट्रक चालकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे रविवारी (ता. ९) रात्री दहा वाजनेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय 38 वर्षे, रा. वाकवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली, (Haveli) मुळगाव-बक्षी हिप्परगा जि. सोलापुर) हे त्या गळफास घेणाऱ्या ट्रक चालकाचे नाव आहे. हणुमंत याने आत्महत्या करण्यापुर्वी पत्नी प्रज्ञा (वय 28 वर्षे) हिचा गळा आवळुन तर लहाण बाळ, शिवतेज याचा चाकुने गळ्यावर वार करुन खुन केल्याचे आढळुन आले आहे. (One commits suicide by killing wife and child)

दरम्यान, हणुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा अर्जुण शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हनुमंत शिंदे याने केलेल्या कृत्याचे नेमके कारण पुढे आले नसले तरी, लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतुन हनुमंत शिंदे याने वरील पावुल उचलले असल्याची शक्यता हनुमंत शिंदे याचे नातेवाईक व लोणी काळभोर पोलिसांनीही व्यक्त केली आहे. 

लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हणुमंत शिंदे हा ट्रक चालक असुन, मागिल अडीच वर्षापासुन वाकवस्ती येथील श्रीधर काळभोर यांच्या खोलीत वडील दर्याप्पा, भाऊ सोमनाथ (वय-३५), पत्नी प्रज्ञा, मोठा मुलगा प्रथमेश (वय- ७), मुलगी ईश्वरी (वय- ४) व लहाण मुलगा शिवतेज याच्यासह भाड्याने राहत होता. कोरोनामुळे मागिल तीन महिण्यापासुन हणुमंत घरीच होता. 

रविवारी सोमनाथ हा कामावर गेला होता तर हणुमंत हा वडील व पत्नी व त्याच्या तीन मुलांच्यासह घरीच होता. दर्याप्पा यांना पान खाण्याचा शौक असल्याने, दुपारी बारा वाजेच्या सुमारास पान आणन्यासाठी लोणी स्टेशनला गेले होते. दर्याप्पा पान घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी आले असता, हणुमंत, त्याची पत्नी प्रज्ञा व लहाण मुलगा शिवतेज बेडरुमचे दार बंद करुन, बेडरुममध्ये झोपल्याचे दर्याप्पा यांना दिसुन आले. तर प्रथमेश, मुलगी ईश्वरी हे दोघेही हॉलमध्ये खेळत होते. मुलगा व सुन झोपली असतील म्हणुन दर्याप्पा यांनीही हणुमंतच्या बेडरुमकडे दुर्लक्ष केले. 

हणुमंत हा सायंकाळी सहा वाजेनंतरही बेडरुम उघडत नसल्याचे पाहुन, दर्याप्पा, प्रथमेश व  ईश्वरी यांनी दरवाजा उघडावा यासाठी हणुमंत व प्रज्ञा यांना आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र कसलाही आवाज येत नसल्याने, दर्याप्पा यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास हणुमंत यांच्या बहीणीला फोन करुन, हणुमंत दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. यावर ही बाब सोमनाथ यालाही कळवली. सोमनाथ व त्याच्या बहिणीने दहा वाजता येऊन, हणुमंत याच्या बेडरुमचा दरवाजा उघडण्साठी हणुमंत यांना आवाज दिला. (One commits suicide by killing wife and child)

कसलाच प्रतिसाद येत नसल्याचे लक्षात येताच, स्थानिक नागरीकांनी हणुमंत याच्या बेडरुची मागिल खिडकी तोडली. खिडकीतुन आत पाहिले असता, हणुमंत हा पंख्याला गळफास घेतल्याच्या अनवस्थेत तर प्रज्ञा व शिवतेज निपचीत पडल्याचे आढळुन आले. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक सतीश काळे, पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, जयंत हन्चाटे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. 

वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी. याबाबत अधिक माहीती देतांना म्हणाले, हनुमंत शिंदे याचे वडील दर्याप्पा, यांनी दिलेल्या प्राथमिक तक्रारीनुसार पोलिसांनी हनुमंत याच्या विरुध्द आत्महत्या व पत्नी व मुलाचा खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दर्याप्पा, भाऊ सोमनाथ, व हणुमंत याच्या कांही नातेवाकांच्या बरोबर चर्चा केली असली तरी, हणुमंत शिंदे याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ठ झालेले नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com