Good News : परिस्थिती सुधारतेय; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट...

कोरोनाबाधितांची संख्या घटण्यासोबतच आता गंभीर संवर्गातील रुग्णांचीही संख्या हळूहळू घटत आहे. मृतांची संख्या घटत चालली आहे. आजच्या संख्येनुसार जिल्ह्यात ५४ हजार ७३२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यांपैकी ४४ हजार ९७ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत.
Corona Nagpur Ziro Mile
Corona Nagpur Ziro Mile

नागपूर : कोरोनाची दहशत कायम (Corona's panic persists) असली तरी हळूहळू का होईना नागपूर जिल्ह्यात स्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. (Condition improvement in Nagpur district) लोकांमध्येही बऱ्यापैकी जागृती झाली असून भिती कमी होऊ लागली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. कोरोनावर आता लवकच मात करता येईल, (Corona can now be overcome quickly) ही आशा बळावली आहे. 

जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती आता आटोक्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ७३ मृत्यू झाले. रविवारी दिवसभरात ३ हजार १०४ जणांना कोरोनाने विळख्यात घेतले तर ६ हजार ५४४ जणांनी कोरोनावर मात केली. 

जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण घटून कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ९ दिवसांपासून हेच समीकरण सुरू आहे. रविवारी शहरातील ४ हजार ३६२ तर ग्रामीण भागातील २ हजार १८२ अशा ६ हजार ५४४ जणांनी कोरोनाला हरवले. यामुळे आतापर्यंतचा कोरोनामुक्तांचा आकडा ३ लाख ८६ हजार २०१ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत घसरले होते. मात्र ९ दिवसांत हे प्रमाण ८६ टक्क्यांवर पोहोचले. आज दिवसभरात मृतांच्याही संख्येत घट नोंदविली गेली. शहरातील ४७, ग्रामीणमधील १५ व जिल्ह्याबाहेरील ११ अशा ७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार १४२ झाली आहे. जिल्ह्यात १७ हजार ८३५ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. त्यांपैकी केवळ १७.४० टक्के म्हणजेच ३ हजार १०४ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आलेत. यामध्ये शहरातील १ हजार ६१४, ग्रामीणचे १ हजार ४७९ व जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४९ हजार ७५ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ लाख ६१ हजार ३०७ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. 

गृहविलगीकरणातील रुग्ण झाले कमी 
कोरोनाबाधितांची संख्या घटण्यासोबतच आता गंभीर संवर्गातील रुग्णांचीही संख्या हळूहळू घटत आहे. मृतांची संख्या घटत चालली आहे. आजच्या संख्येनुसार जिल्ह्यात ५४ हजार ७३२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यांपैकी ४४ हजार ९७ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. 

१ ते ९ मे या कालावधीतील कोरोना स्थिती 
-कोरोनाबाधित -३७ हजार १ 
-कोरोना मृत्यू -७५४ 
-कोरोनामुक्त -६२५०० 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com