हा तुमचा युपी, बिहार नाही, महाराष्ट्र आहे ; चाकणकरांनी दरेकरांना खडसावले 
rupali chakankar pravin darekar sarkarnama.jpg

हा तुमचा युपी, बिहार नाही, महाराष्ट्र आहे ; चाकणकरांनी दरेकरांना खडसावले 

प्रविण दरेकर, (Pravin Darekar) आपण काहीही बोलू, वागू आणि ते खपून जाईल ही मग्रुरी आहे. हा तुमचा उत्तर प्रदेश आणि बिहार नाही. हा महाराष्ट्र आहे.

पुणे: 'प्रविण दरेकर, (Pravin Darekar) आपण काहीही बोलू, वागू आणि ते खपून जाईल ही मग्रुरी आहे. हा तुमचा उत्तर प्रदेश आणि बिहार नाही. हा महाराष्ट्र आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुनावले आहे. इतकेच नव्हे तर, आम्हीही समजेल अशा भाषेत सांगू शकतो. रंगविण्याची भाषा कशी असते दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दरेकरांना दिला आहे.  (Rupali Chakankar scolded Praveen Darekar) 

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar)  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानतंर, प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसांपुर्वी एका जाहीर सभेत नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे', असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावर रुपाली चाकणकरांनी त्याना महिलांची माफी मागण्याचा इशाराही दिला. मात्र तरीही दरेकरांनी यावर स्पष्टीकरण देताना, माझे वक्तव्य नीट ऐकले तर त्याचा अर्थ कळेल पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे, कारण अशा वक्तव्यांमुळे त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. असे म्हणत माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले.  या घडामोडीनंतर पुन्हा एकदा आता भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आले आहेत.

काय बोलले होते प्रवीण दरेकर? 

दोन दिवसांपुर्वी पुण्यात आयोजित रामोशी समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.  अशी घणाघाती टिका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली. 

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? 

'प्रवीण जी दरेकर आपण बोललात की, 'राष्ट्रवादी हा रंगलेला गालांचा मुका घेणारा पक्ष आहे.' पण तुम्ही महिलांबद्दल सातत्याने असे बोलताय, महिलांना दूय्यम वागणूक देणे ही तुमची आणि तुमच्या पक्षाची परंपरा आहे. तुमच्या बोलण्यातून जी घाण टपकतेय ती तुमच्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देत आहे. तुमच्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचे किती कैवारी आहोत, हे त्या दाखवून देत आहेत. पण मला त्यांची किव वाटत आहे. त्या अशा पक्षात काम करत आहेत, ज्या पक्षाचा महिलांबाबत असा विचार आहे. पण तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृतीही समजली आहे. त्यामुळे प्रवीणजी दरकेर तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपले गाल आणि थोबाड दोन्हीही रंगवू शकतो. याची जाणीव ठेवावी.'' 

या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलाच आक्रमक भुमिका घेत दरेकरांना महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागण्याचा इशारा दिला.  मात्र तरीही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरांनी केलेले वक्तव्य हे बोलीभाषेत केले असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली. तथापि, या सर्व घटनाक्रमानंतर प्रवीण दरेकर माफी मागतात की रुपाली चाकणकर त्यांचे थोबाड फोडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in