महिला आयोग अध्यक्षपदासाठी 'राष्ट्रवादी'च्या चाकणकर, चव्हाण यांच्या नावाची चर्चा

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद‌ राष्ट्रवादीकडे‌ जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sarkarnama - 2021-09-15T104443.754.jpg
Sarkarnama - 2021-09-15T104443.754.jpg

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला दीड वर्ष झाले तरीही राज्यात महिला आयोगाची स्ठापना न झाल्याने विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. साकीनाका प्रकरणावरुन राज्यातील महिला आयोगाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साकीनाका प्रकरणावरुन राष्ट्रीय महिला आयोगाने महाविकास आघाडीने ताशेरे ओढले आहेत. 

राज्य महिला आयोगाचं (Women Commission) अध्यक्षपद‌ कोणत्या पक्षाकडे जाणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद‌ राष्ट्रवादीकडे‌ जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  राष्ट्रवादी कॉग्रेस यासाठी आग्रह असल्याचे समजते.  महिला आणि बालकल्याण खाते कॉग्रेसकडे असल्याने राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचे समजते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नावं चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी आंदोलनाच्या पावित्र्यात ; टोल विरोधात राजकारण तापणार
महिला आयोगाच्या यापूर्वीच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२०ला राजीनामा दिला आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रहाटकर यांना राजीनामा देण्याचे आणि आयोगाच्या नव्या अध्यक्षांची ५ फेब्रुवारीपर्यंत नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्देशांकडेही दुर्लक्ष करत राज्य सरकारने हे पद आजपर्यंत रिक्त ठेवले आहे.

आयोगाच्या १९९३मधील कायद्यान्वये या पदाला संरक्षण आहे. महिला आयोग राज्य सरकारला शिफारशी करू शकते. महिलांना न्याय मिळवून देण्यात आयोग कळीची भूमिका बजावतो. मात्र, आयोगावरील नेमणुकांनी राजकीय वळण घेतले आहे. सध्या तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्याने वाद टाळावेत, या भूमिकेतून आयोगावरील नियुक्त्याच न करण्याचा विचार केला जात असेल तर ते महिलांवर अन्याय करणारे आहे, असे मत महिला चळवळीतील कार्यकर्त्यांचे आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com