चंद्रकांत पाटलांचा फॉर्म्युला  ‘बाहेरून दोस्ती, आतून कुस्ती’.. मोहोळांचा दादागिरी ‘पॅटर्न’ 

मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर या नेत्यांनी पक्षात काहीही कुरघोड्या केल्या तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही.
Sarkarnama Banner - 2021-06-06T103331.299.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-06T103331.299.jpg

पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. यावर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. NCP Pune president Prashant Jagtap targeted BJP president Chandrakant Patil 
 
गट-तट, कलह हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याने आम्हाला त्याचे काही देणे-घेणे नाही. मात्र, या कलहातून प्रशासनाची नालस्ती करून प्रशासनाला पर्यायाने पुणेकरांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे, ते निषेधार्ह आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले.  ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पुण्यात आल्यापासून त्यांनी ‘बाहेरून दोस्ती, आतून कुस्ती’ असा फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे विविध गटांत भांडणे लागली आहेत. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न केवळ पक्षापुरता मर्यादित न राहता, हा कलह रोज खुलेपणाने जनतेसमोर येत आहे. 

"पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सध्या अंतर्गत गटातटाने ग्रासले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात आगमन झाल्यापासून हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर या नेत्यांनी पक्षात काहीही कुरघोड्या केल्या तरी आम्हाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या अंतर्गत कलहातून प्रशासनाला वेठीस धरले जात आहे. ‘पीएमपी’चे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात घुसून संगणकात केलेली छेडछाड असो वा तेथील कर्मचाऱ्यांना दिलेली धमकी असो, यातून सुसंस्कृत असलेल्या आपल्या पुण्यात ‘सुसंस्कृत’ म्हणवल्या जाणाऱ्या पक्षाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दादागिरीचा ‘पॅटर्न’ राबविण्यात येत आहे. हे पुणेकरांसाठी नक्कीच दुर्दैवी आहे," असे प्रशांत जगताप म्हणाले. 

पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत दिले. या बहुमताचा वापर पुणेकरांच्या कल्याणासाठी, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न करता अंतर्गत गट-तटाच्या माध्यमातून एकमेकांची जिरवण्यासाठी केला जात आहे. प्रशासनाला वेठीस धरले जात आहे. चांगल्या अधिकाऱ्यांची बदनामी करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. एकमेकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून दुसऱ्यांवर गोळी मारण्याचा हा प्रकार असून, त्यामुळे प्रशासनाचे पर्यायाने पुणेकरांचे नुकसान होत आहे. भाजपची ही दादागिरी पुणेकर कदापि स्वीकारणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपकडून सुरू असलेले सर्व खोटे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com