ठाकरे सरकार निर्लज्ज..कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं..राणे संतप्त  - BJP leader Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार निर्लज्ज..कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं..राणे संतप्त 

अनंत पाताडे 
रविवार, 6 जून 2021

ठाकरे सरकार म्हणजे "खोदा पहाड निकला चुहा"

सिंधुदुर्ग :   तैाते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे. BJP leader Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray

नितेश राणे म्हणाले की, तौते चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई "खोदा पहाड निकला चुहा" अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे . जिथे मच्छिमारांच लाखोंचं नुकसान झालेलं आहे, तिथे फक्त 50 हजार पर्यतची मदत केली.  

हेक्टरी 50 हजार मदत देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे,  म्हणजे एका आंब्याच्या झाडाला 500 रुपये तर नारळाच्या झाडाला 250 रुपये , टपरीला 10 हजार रुपये , एवढे सगळे आकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्च तरी एवढा आहे का ? जी काही कोकणाला मदत केली आहे. मग हे पंचनामे कशासाठी केले आमची आमची थट्टा करण्यासाठी की मजाक उडवण्यासाठी झाले. एका बाजूला लाखोंची करोडोंची नुकसान झालेले आहे.  निर्लज्जपणे केंद्राकडे दोन हजार कोटी मागायचे आणि इथे फक्त अडीच कोटी रुपये द्यायचे असं हे निर्लज्ज ठाकरे सरकार निर्लज्ज आहे. कोकणी माणसाला अक्षरशा वाऱ्यावर सोडले आहे.

नाशिक मध्ये तिसऱ्या लेव्हलच्या निर्बंधाची उद्यापासून अंमलबजावणी
 नाशिक :  नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेट मध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्ण संख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल 3 प्रमाणे निर्बंध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश लवकरच जारी  करण्यात येणार आहे, उद्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख