राष्ट्रवादीला झटका : सलग दहा वर्षे तालुकाध्यक्ष राहिलेला नेता भाजपत दाखल

त्यांना तालुका अध्यक्षपदावरून पक्षाने हटविल्यानंतर खेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला अपयशाला सामोरे जाव लागले होते.
NCP Khed taluka Former president Shantaram Bhosale joins BJP
NCP Khed taluka Former president Shantaram Bhosale joins BJP

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला असून सलग दहा वर्षे पक्षाचे तालुकाध्यक्षपद सांभाळलेले शांताराम भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. भोसले यांनी आज (ता. १९ जुलै) पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर केला आहे. (NCP Khed taluka Former president Shantaram Bhosale joins BJP) 

पुण्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भोसले यांच्या झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास माजी मंत्री संजय बाळा भेगडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आदी उपस्थित होते.

खेड आळंदी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून शांताराम भोसले यांनी सलग दहा वर्ष कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी कॉग्रेसला खेड मतदारसंघात विधानसभेत यश मिळाले होते. मात्र, त्यांना तालुका अध्यक्षपदावरून पक्षाने हटविल्यानंतर खेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला अपयशाला सामोरे जाव लागले होते. मात्र, आता भारतीय जनता पक्षाने नव्याने राजकिय समीकरणांची जुळवाजुळव करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांना भाजपमध्ये प्रवेश देत नवी खेळी खेळली आहे. ती आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीत उपयोगी ठरण्याची आशा भाजप नेतृत्वाला आहे. 

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीत देशमुख यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना सूक्ष्म नियोजन करत भाजपने संघटना बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातूनच भोसले यांना भाजमध्ये प्रवेश देत निवडणुकीच्या दृष्टीने भाजप तयारीला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना खेड तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये असणारा शांतराम भोसले यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेत भाजपने त्यांना पक्षात संधी दिली आहे. आगामी काळात भोसले यांच्यावर भाजपकडून महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com