धक्कादायक : तडीपार गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या   - Murder Rahul Wadekar Rajgurunagar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

धक्कादायक : तडीपार गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

राजगुरुनगर शहरातील टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते

राजगुरुनगर : राजगुरुनगर Rajgurunagar शहरात तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर Rahul Wadekar याच्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून फायरिंग Crime करत डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  

राजगुरुनगर शहरातील टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते, मात्र, आता या गुन्हेगारीने पुन्हा तोंडवर काढत काल मध्यरात्री तडीपार असलेला गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर यांची हत्या करण्यात आली.  तो राजगुरूनगर शहरात येत असताना शहरालगत पाबळरोड येथे जुन्या गुन्हेगारी वादातून वाडेकर याच्या पिस्तुलातून फायरिंग करुन त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात वाडेकरचा जागीच मृत्यू झाला आहे. राजगुरुनगर पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे.

ग्रामीण भागात लहान वयातील गुन्हेगारी, टोळीयुद्ध संपविण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना काही टोळ्या प्रमुखांना तडीपार केले होते. मात्र, साथीदारांकडून एकमेकांनी शह देण्याचे काम सुरुच राहिल्याने हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : हसन मुश्रीफांवर आमदार शिवेंद्रसिंहराजें संतापले 
 
सातारा : मुंबईत अतिरेक्याच्या हल्ल्यात शहिद झालेले तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्मारकासाठी ५ कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यावरुन आमदार शिवेंद्रसिंह राजे संतापले आहेत.  
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख