म्युकरमायकोसिसबाबत खासदार कोल्हेंची सरकारकडे ही मागणी

कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 Amol Kolhe .jpg
Amol Kolhe .jpg

हडपसर : म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या संसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरोसीन बी इंजेक्शन्स अतिशय महागडी आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केंद्रीय खते व रसायन खात्याचे मंत्री सदानंद गौडा, (Sadanand Gowda)  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि केंद्रीय औषध प्रबंध महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (MP Amol Kolhe demanded reduction in the cost of amphotericin B injection)

गेल्या काही दिवसांपासून कोविड (Kovid19) आजारातून बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अॅम्फोटेरोसीन बी इंजेक्शन्सचा वापर केला जातो. ही इंजेक्शन अतिशय महागडे असून त्याची बाजारातील किंमत रु.७९०० इतकी असून साधारणतः ७५०० रुपयाला मिळत आहे. एका रुग्णाला किमान १० इंजेक्शन्सची गरज भासते. त्यामुळे या इंजेक्शनसाठी येणारा प्रचंड खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गौडा आणि राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांचे लक्ष वेधले आहे.

तसेच केंद्रीय औषध नियंत्रक महानिदेशक (Drugs Controller General of India) व केंद्रीयमंत्री गौडा आणि आरोग्यमंत्री टोपे यांना तातडीने लक्ष घालून अॅम्फोटेरोसीन बी इंजेक्शन्सच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिर वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी या इंजेक्शनचे वितरण अन्न व औषध विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे देण्याची मागणी केली होती. 

त्याची दखल घेऊन प्रशासनाने रेमडेसिव्हिरच्या वितरणासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होण्यास चाप बसला होता. भविष्यात अॅम्फोटेरोसीन-बी इंजेक्शन्सबाबत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उत्पादनात वाढ करुन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com