एका सुनील टिंगरेच्या जुगार अड्ड्यावर छापा...मनस्ताप मात्र आमदारांना!

सुनील टिंगरे नावाचे मंडळी त्यांच्या व्हाॅटस ॲपवर आमदार टिंगरे यांचा डिपी ठेवतात.
MLA Sunil Tingre's headache increased due to the similarity of the name
MLA Sunil Tingre's headache increased due to the similarity of the name

येरवडा (पुणे) : शेक्सपिअरने ‘नावात’ काय असे म्हटले आहे. पण, नावात बरेच काही असते, याची प्रचिती अनेकांना वेळोवेळी आली आहे, काहींना येते आहे. वडगावशेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची मात्र नावाच्या साधर्म्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या नात्यागोत्यातच सुनील टिंगरे नावाचे सहाजण आहेत. ते सुनील टिंगरे नावाचा फायदा घेतात. यातील काही जणांच्या दृष्यकृत्यांमुळे अनेक वेळा आमदार टिंगरे हेच अडचणीतसुद्धा आले आहेत. (MLA Sunil Tingre's headache increased due to the similarity of the name)

आमदार सुनील विजय टिंगरे यांच्या मतदारसंघात नव्हे; तर त्यांच्या धानोरी व टिंगरेनगर प्रभागात सहाजण सुनील टिंगरे नावाचे राहतात. त्यामुळे त्यांची अनेक वेळा अडचण होते आहे. पोलिस पडताळी असो कि निवडणूक असो नावाच्या साधर्म्यामुळे त्यांच्यासह अनेकांचा गोंधळ उडतो. काही वेळा रात्री अपरात्री त्यांना चौकशीसाठी पोलिसांचा फोन येतो. त्यांनी खुलासा केल्यानंतर पोलिसांचे शंका निरसन होते. मात्र, त्याचा मनस्ताप आमदारांना होतो. 

नुकतीच पोलिसांनी धानोरी परिसरातील जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यामध्ये जुगार अड्डाचालक सुनील दीपक टिंगरे यांना अटक झाली. मात्र, सुनील टिंगरे यांचा जुगार अड्डा अशी बातमी समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली, त्याचा मनस्तापसुद्धा त्यांना झाला. मात्र, नात्यागोत्यातील मंडळींमुळे ते गोत्यात आल्याचे ते स्पष्टपणे सांगतात. विशेषत: ही सुनील टिंगरे नावाचे मंडळी त्यांच्या व्हाॅटस ॲपवर आमदार टिंगरे यांचा डिपी ठेवतात, त्यामुळे इतरांना लवकर शहानिशाही करता येत नाही.

 
मारामारीने केली दुसऱ्याने निवडणुकीत पराभव झाला माझा

पुणे महानगरपालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत मतदानाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी सुनील यशवंत टिंगरे या उमेदवाराची विरोधी पक्षाच्या उमेदवारांसोबत मारामारी झाली. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात सुनील टिंगरे यांची विरोधी उमेदवाराला मारहाण अशी बातमी प्रसिद्ध झाली. त्याचा तोटा मात्र त्यावेळी निवडणूक लढवणारे व आताचे आमदार असलेल्या सुनील विजय टिंगरे यांना झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पराजय झाल्याची कबुलीही आमदार टिंगरे आजही देतात. 

धानोरी व टिंगरेनगर परिसरात सुनील टिंगरे नावाचे सहाजण आहेत. माझ्या वडिलांचे नाव ‘विजय’ तर इतरांचे वडिल अनंता, यशवंत, दीपक, दत्तात्रेय, भिमाजी अशी आहेत. सर्वजण नात्यागोत्यातील आहेत. मात्र, यापैकी कोणी काही कृत्य केले तर माझी अडचण होते. त्यांचा मनस्ताप होतो.
- आमदार सुनील टिंगरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com